मुंबई | दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर टीम इंडिया आता अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेचं आयोजन हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. रोहित शर्मा याची कर्णधार म्हणून एन्ट्री झाली आहे. रोहित शर्माला या टी 20 मालिकेत 5 विक्रम करण्याची संधी आहे. रोहित 5 विक्रम करत इतिहास रचु शकतो.
रोहितला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. रोहितला 4 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 147 धावांची गरज आहे. रोहितच्या नावावर सध्या 3 हजार 853 धावा आहेत. सध्या टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहेत.
रोहितकडे विराटला मागे टाकून टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. त्यासाठी रोहितला 156 धावा कराव्या लागतील. विराटच्या नावावर सध्या 4 हजार 8 धावा आहेत.
रोहितला टी 20 मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम करण्याची संधी आहे. सूर्या आणि रोहितच्या नावावर 4 शतकं आहेत. त्यामुळे रोहितने आणखी 1 शतक ठोकल्यास तो टी 20 मध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरेल.
टी 20 क्रिकेटमध्ये रोहितला पाकिस्तानच्या बाबर आझमला याला मागे सोडण्याची संधी आहे. बाबर आझमच्या नावावर 30 अर्धशतकं आहेत. रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध 1 अर्धशतक केल्यास बाबरच्या विक्रमाची बरोबरी होईल. तर 2 अर्धशतक केल्यास रोहित बाबरला मागे टाकेल.
सध्या विराट कोहली टीम इंडियाकडून सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. विराटने आतापर्यंत 356 चौकार लगावले आहेत. तर रोहितच्या नावावर 348 चौकार आहेत. त्यामुळे रोहित विराटला मागे टाकण्यापासून फक्त 9 चौकार दूर आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.