मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. यजमान आफ्रिका संघाने पहिला सामना जिंकत मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.या सामन्याआधी कॅप्टन रोहित शर्माच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टींवर खुलासा केला. पहिल्या सामन्यातील पराभव झाला असला तरीसुद्धा मालिका गमावायची नसल्याचं रोहित शर्मा याने म्हटलं आहे.
मला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आवडत नाही. तुम्ही एकतर ओपनिंग करा किंवा पाच सहा नंबरवर बॅटींग करावी, असं माझं मत आहे. गिल खूप हुशार खेळाडू आहे त्याला खेळ चांगला समजतो. गिल याआधी तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे. रणजी करंडकचाही त्याला अनुभव आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरू करू शकतो. ओपनर जर पहिल्या बॉलर आऊट झाला किंवा जखमी झाला तर तुम्हाला ओपनरचीच भूमिका निभावायची असल्याचं रोहित शर्मा याने म्हटलं आहे.
LIVE: Team India’s Live Press Conference from Newlands | SA vs IND https://t.co/1jizEduwm9
— Star Sports (@StarSportsIndia) January 2, 2024
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात आफ्रिकेकडून डीन एल्गर याने 185 धावांची दमदार खेळी केली होती. त्यासोबतच वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाने गुडघे टेकले होते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान