SL vs IND: श्रीलंकेने विजयाचा घास हिसकावला, रोहित शर्माने कुठं चुकलं ते सांगितलं

| Updated on: Aug 03, 2024 | 1:17 AM

Rohit Sharma On 1st Odi SL vs IND: रोहित शर्माच्या झंझावाती अर्धशतकानंतर टीम इंडिया हा सामना जिंकणार नाही, असा कुणीही विचारही केला नसेल, मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी तसं करुन दाखवलं, पण ते ही जिंकले नाहीत.

SL vs IND: श्रीलंकेने विजयाचा घास हिसकावला, रोहित शर्माने कुठं चुकलं ते सांगितलं
sl vs ind 1st odi rohit sharma
Follow us on

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात झालेला पहिला एकदिवसीय सामना जिंकण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले. टीम इंडियाने जवळपास सामना जिंकला होता, मात्र श्रीलंकेने विजयाचा घास हिसकावला. मात्र असं करुनही त्यांनाही विजयी होता आलं नाही. मात्र श्रीलंकेचाच एका अर्थाने विजय झाला, असं म्हटलं जात आहे. टीम इंडियाला विजयासाठी 14 बॉलमध्ये 1 धावेची गरज असूनही जिंकता आलं नाही. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयी होण्यापासून रोखलं. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 230 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 230 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. टीम इंडियाच्या या अपयशानंतर कॅप्टन रोहित शर्मा निराश दिसून आला. रोहितने टीम इंडियाचं कुठं चुकलं ते सांगितलं.

कॅप्टनने सांगितली चूक

“हे विजयी आव्हान पूर्ण करता आलं असतं. मात्र तिथवर पोहचण्यासाठी चांगली बॅटिंग करायला पाहिजे. आम्ही चांगली सुरुवात केली. मात्र नंतर विकेट गेले. त्यानंतर अक्षर पटेल आणि केएल राहुल या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करुन टीम इंडियाला सामन्यात कायम ठेवलं. शेवट थोडा निराशाजनक राहिला. विजयासाठी 14 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना विजय मिळवता येत नाही तर चांगलं वाटतं नाही. श्रीलंका चांगली खेळली”, असं रोहितने सांगितलं.

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकला. पाथुम निसांका 56 आणि दुनिश वेल्लालगे याने नाबाद 67 धावांची खेळी केली. त्या जोरावर श्रीलंकेने 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाकडून रोहित शर्माने 56 धावांची खेळी करुन चांगली सुरुवात दिली. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शेवटी शेवटी शिवम दुबे याच्याकडून अपेक्षा होता.  मात्र श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असालंका याची 48 वी ओव्हर निर्णायक ठरली. असालंकाने चौथ्या आणि पाचव्या बॉलवर सलग 2 विकेट्स घेऊन टीम इंडियाला ऑलआऊट केलं आणि सामना टाय झाला.

चरिथने चौथ्या बॉलवर शिवम दुबेला एलबीडब्ल्यू केलं. शिवमच्या रुपात भारताने नववी विकेट गमावली. त्यानंतर अर्शदीप सिंह मैदानात आला. आता भारताला 14 बॉलमध्ये विजयासाठी 1 धावेची गरज होती. तेव्हा अर्शदीप मोठा फटका मारण्याच्या नादात एलबीडब्ल्यू झाला. अशाप्रकारे टीम इंडियाला ऑलआऊट झाली.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.