आयपीएलच्या 17 व्या मोसमातून मुंबई इंडियन्सचं पॅकअप झालंय.आता काही दिवसांनी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता मोजून 17 दिवस शिल्लक आहे. आयसीसीच्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेचं आयोजन हे 2 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. एकूण 20 संघांमध्ये एका वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर हार्दिक पंड्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी रोहित शर्माने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. रोहितने या मुलाखतीत निवृत्तीबाबत बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्माने dubai eye 103.8 या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. एकूण तिघांनी रोहितची मुलाखत घेतली. एकूण 21 मिनिटं आणि 34 सेंकदांचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. रोहितने या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. रोहितने क्रिकेट कारकीर्द, कॅप्टन्सी आणि विविध मुद्द्यांना हात घालत त्याला काय वाटतं हे सांगितंल.
“टीम इंडियासोबतचा 17 वर्षांचा शानदार राहिला. तसेच आशा आहे की मी आणखी काही वर्ष खेळून वर्ल्ड क्रिकेटवर प्रभाव टाकेन. मी माझ्या आयुष्यात प्रगतीपेक्षा जास्त अधोगती पाहिली आहे. मी आज जे आहे ते मी पाहिलेल्या चढ-उतारांमुळे आहे, त्यामुळे मी आहे”, असं रोहितने स्पष्ट करत पुढील आणखी काही वर्ष खेळत असल्याचं म्हणत निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावला.
हिटमॅन निवृत्तीबाबत म्हणाला…
Rohit Sharma said “The journey has been wonderful, it has been 17 years, still hope to play a few more years as well & make an impact in World cricket”. [Dubai Eye 103.8 YT] pic.twitter.com/C4hYZzAiHg
— Johns. (@CricCrazyJohns) May 15, 2024
तसेच रोहितने वैयक्तिक विक्रमांपेक्षा कर्णधारपद महत्वाचं असल्याचं म्हटलं. टीम इंडियाची कॅप्टन्सी करणं हे माझ्यासाठी गर्वाची आणि सन्मानाची बाब आहे. मी इथवर पोहचेन आणि नेतृत्व करेन, असा विचारही कधी केला नव्हता. चांगल्या माणसांसोबत चांगलं होतं. नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा एका दिशेने पुढे जायचं ठरवलेलं. सांघिक खेळ अशाच प्रकारे खेळायला हवा. याचा वैयक्तिक विक्रम याच्यासह काही घेणंदेणं नाही. 11 खेळाडूंनी एकत्र खेळायला हवं आणि ट्रॉफी जिंकणं हा अंतिम उद्देश असायला हवा” असं रोहितने म्हटलं.