टीम इंडियाच्या 17 वर्षांनंतरच्या टी 20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद साऱ्या भारतीयांना आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये 29 जून रोजी बारबाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप विजयाला 4 दिवस उलटून गेले. मात्र त्यानंतरही टीम इंडिया तसेच भारतीयांच्या उत्साहात काडीमात्र कमी झालेली नाही. उलटपक्षी टीम इंडियाचे खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. टीम इंडियाचे खेळाडू 15-16 तासांचा प्रवास केल्यानंतर 4 जुलै रोजी सकाळी 6 ते साडेसहा दरम्यान नवी दिल्ली विमानतळावर पोहचले. तिथून खेळाडू काही मिनिटं अंतरावर असलेल्या हॉटेलात पोहचले. हॉटेलात पोहचताच टीम इंडियाच्या खेळाडूंचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळेस कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल या तिघांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही. या तिघांच्या नाचण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
टीम इंडिया नवी दिल्ली विमानतळावरुन आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये पोहचले. इथे टीम इंडियाच्या स्वागतासाठी हॉटेलचे कर्मचारी उपस्थित होतेच तसेच टीम इंडियाची बस पोहचताच तिथे भांगड्याने स्वागत करण्यात आलं. तेव्हा सूर्यकुमार यादवने यशस्वी जयस्वालसह भांगड्यावर ठेका धरला. तसेच सूर्याने फुगडी घातली. सूर्याने नाचताना एकच माहोल केला. तर कॅप्टन रोहितलाही भांगड्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. सूर्या, रोहित आणि यशस्वी या तिघांचा भांगडा डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान टीम इंडिया 15 तासांच्या प्रवासानंतर हॉटेलमध्ये थोडा वेळ विश्रांती घेणार आहे. त्यानंतर टीम इंडिया काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना होणार आहेत. टीम इंडिया खेळाडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खास बातचीत होणार आहे.
सूर्याचा भांगडा आणि मग फुगडी
Suryakumar Yadav erupts in joy after landing in India. 😂❤️pic.twitter.com/onaJ0zrdFg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.