Rohit Sharma | आशिया कप 2023 आधी रोहित शर्मा सहकुटुंब तिरुपती बालाजी दर्शनला, व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Aug 13, 2023 | 5:53 PM

Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple | रोहित शर्मा याने एशिया कप 2023 आधी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. रोहितचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Rohit Sharma | आशिया कप 2023 आधी रोहित शर्मा सहकुटुंब तिरुपती बालाजी दर्शनला, व्हीडिओ व्हायरल
Follow us on

आंधप्रदेश | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी 20 मालिका खेळत आहे. ही 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियाचा हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. या पाचव्या सामन्यासाठी टीम इंडियाने नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. त्याआधी टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकली. टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजनंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.

आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर सिनिअर खेळाडू हे आगामी आशिया कप 2023 च्या पार्श्वभूमीवर तयारी करत आहे. आशिया कपनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कपही पार पडणार आहे. त्याआधी रोहित शर्मा पत्नी रितिका आणि मुलगी समायरा या तिघांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे. रोहितच्या या तिरुपती दर्शनाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

रोहितला पाहण्यासाठी एकच गर्दी


रोहित तिरुपती बालाजी दर्शनाला आल्याचं समजताच चाहत्यांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली. रोहितची एक झलक पाहण्यासाठी एकच गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान रोहित शर्मा याने गेल्या 4 वर्षात दुसऱ्यांदा सहकुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे. रोहित शर्मा 2019 साली आयपीएल फायनलआधी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं होतं.

तिरुपती बालाजी रोहितला पावणार?

रोहितने 9 मे 2019 रोजी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा रोहितसोबत दिनेश कार्तिक हा देखील उपस्थित होता. त्यानंतर काही महिन्यांनी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली होती. रोहितने त्या एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 6 शतक ठोकत श्रीलंकेच्या कुमार संगकारा याच्या विक्रमाची बरोबरी केली होती.


त्यामुळे आता रोहित तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तशीच कामगिरी करणार का, असं ट्विटरवर म्हटलं जात आहे.