मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला असून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होणार आहे. रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने हार्दिक पंड्या बाहेर गेल्यावर सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना संघात स्थान दिलं होतं. तेव्हापासून भारतीय संघात कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही. दोन्ही संघांनी आजच्या सामन्यात आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही.
Huge Roar for the Face Of World Cricket Rohit Sharma at the Toss 🦁❤#INDvsNZ | #RohitSharma | #IndiaVsNewZealand pic.twitter.com/je7djUjyst
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) November 15, 2023
भारत पहिल्यांदा फलंदाजी करत न्यूझीलंडला किती धावांचं आव्हान ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघानी एकच मास्टरप्लॅन ठेवला असून आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. भारताची बॅटींग ऑर्डर कशी कामगिरी करते पाहावं लागणार आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचं आव्हान रोहितसमोर असणार आहे.
रोहित आजही तोडफोड फलंदाजी करणार की त्याला किवींचे गोलंदाज रोखणार हे काही वेळातच दिसेल. डावखुऱ्या गोलंदाजासमोर रोहित कमजोर असलेला दिसला होता. मात्र रोहितने आता आक्रमक पवित्रा स्वीकारत विरोधी संघाला बॅकफूटवर ढकललं आहे. त्यामुळे रोहितने आजही तशीच सुरूवात केली तर
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज