Icc World Cup 2023 | युवराज सिंह याच्यानंतर चौथ्या नंबरवर…, रोहित शर्मा वर्ल्ड कपआधी बोललाच

| Updated on: Aug 10, 2023 | 10:10 PM

Rohit Sharma | रोहित शर्मा याने वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाला असलेलं टेन्शन जाहीरपणे सांगून टाकलंय.

Icc World Cup 2023 | युवराज सिंह याच्यानंतर चौथ्या नंबरवर..., रोहित शर्मा वर्ल्ड कपआधी बोललाच
rohit sharma
Follow us on

मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. तर आयसीसी वनडे वर्ल्ड कपचा श्रीगणेशा 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. दोन्ही महत्वाच्या स्पर्धांचं काऊंटडाऊन सुरु झालंय. ही स्पर्धा जशीजशी जवळ येतेय, तसं टीम इंडियाचं टेन्शन दुप्पटीनं वाढतं चाललंय. टेन्शन वाढण्याचं कारण म्हणजे नंबर 4 वर खेळणार कोण? वर्ल्ड कपच्या तोंडावर कॅप्टन रोहित शर्मा याने चौथ्या नंबरबाबत चिंता व्यक्त केलीय. टीम इंडियाकडून गेल्या काही वर्षात असंख्य असे खेळाडू खेळले. मात्र टीम इंडियाला चौथ्या नंबरवर खेळू शकेल, असा बॅट्समनचा शोध अजून थांबलेला नाही. चौथ्या नंबरवर कुणाला खेळवायचं हे आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं रोहितने म्हटलंय.

नंबर 4 चं भूत हे टीम इंडियाच्या मानगुटीवर गेल्या अनेक वर्षांपासून बसलेलं आहे. मात्र टीम इंडियाला त्या चौथ्या स्थानाला न्याय देणारा बॅट्समन सापडलेला नाही. “युवराज सिंह याच्यानंतर दुसरा कोणताही बॅट्समन स्वत:ला चौथ्या क्रमांकावर सेट करु शकलेला नाही”, असं रोहितने म्हटलं.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“नंबर 4 ही गेल्या काही काळापासून आमच्यासाठी डोकेदुखी राहिली आहे. चौथ्या क्रमांकावर युवराज सिंह याच्यानंतर कोणत्याही बॅट्समनला तिथे सेट होता आलं नाही. मात्र श्रेयस अय्यर याने चौथ्या स्थानी बॅटिंग करत उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्याचे आकडेवारी चांगली आहे”, असं रोहित म्हणाला.

हे सुद्धा वाचा

श्रेयस टीम इंडियासाठी अनेकदा चौथ्या क्रमांकावर खेळलाय. ओपनिंग जोडी फ्लॉप ठरल्यानंतर खऱ्या अर्थान वनडाऊन आणि चौथ्या स्थानी खेळणाऱ्या बॅट्समनवर मोठी जबाबदारी असते. श्रेयसने चौथ्या क्रमांकावर खेळताना अनेकदा दमदार कामगिरी केलीय. पण श्रेयस बॅक इंजरीमुळे गेल्या काही महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे.

श्रेयस अय्यर याची वनडे क्रिकेट कारकीर्द

श्रेयस अय्यर याने डिसेंबर 2017 मध्ये वनडे डेब्यू केलं. श्रेयसने आतापर्यंत टीम इंडियाचं एकूण 42 वनडे सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. या 42 सामन्यांमधील 38 डावात 46.60 च्या सरासरीने 1 हजार 631 धावा केल्या आहेत. श्रेयसने या दरम्यान 2 शतक आणि 14 अर्धशतकं झळकावली आहेत.