जोहान्सबर्ग | टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात धमाकेदार अर्धशतक ठोकलं आहे. सू्र्यकुमार यादव याचं दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या या मालिकेतील सलग दुसरं अर्धशतक ठरलंय. सूर्याने सिक्स ठोकत रुबाबदार पद्धतीने हे अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याच्या टी 20 कारकीर्दीतील हे 18 वं तर दक्षिण आफ्रिके विरुद्धचं हे पाचवं अर्धशतक ठरलं. सूर्याने हे अर्धशतक अवघ्या 32 बॉलमध्ये 2 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केल. सूर्याचा या दरम्यान स्ट्राईक रेट हा 159.38 इतका होता.
सूर्याने 13 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने या ओव्हरमध्ये अँडिले फेहलुकवायो याच्या बॉलिंगवर 3 सिक्स आणि 1 चौकाराच्या मदतीने एकूण 22 धावा केल्या. तसेच सूर्याने या अर्धशतकासह पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याचा रेकॉर्ड ब्रेक केला. सूर्या दक्षिण आफ्रिके विरुद्ध सर्वाधिक 5 अर्धशतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने याबाबतीत मोहम्मद रिझवान याला मागे टाकलं. रिझवानच्या नावावर दक्षिण आफ्रिके विरुद्ध 4 अर्धशतकांची नोंद आहे.
सूर्याच्या एकाच ओव्हरमध्ये 22 धावा
There’s no stopping SKY at the moment! 🔥#SuryakumarYadav #SKY #SAvIND #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/zHjxPzAeKl
— Sportskeeda (@Sportskeeda) December 14, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.