मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये आता सेमी फायनल सामन्यांना सुरूवात व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. पहिला सेमी फायनल सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार असून रोहितसेना बदला घेण्यासाठी सज्ज असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली आहे. रोहितचा मुंबईत आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेल्या रोहितसाठी व्हिडीओसह एक खास कॅप्शन लिहिलं होतं. त्यामध्ये, तुम्ही कर्मावर आणि आम्ही शर्मावर विश्वास करत असल्याचं म्हटलं होतं. रोहित आला त्यावेळी त्याच्यासोबत त्याची मुलगी सोबत असलेली पाहायला मिळाली.
न्यूझीलंड संघ भारतासाठी मोठा अडथळा आहे, याआधी भारताला सेमी फायनलमध्ये त्यानंतर कसोटी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यातही भारताला न्यूझीलंडने पाणी पाजलं असतं. रोहितच्या नेतृत्त्वात भारताने वर्ल्ड कपमध्ये आतारपर्यंत कमाल कामगिरी केली आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलण्यापासून दोन विजय दूर आहे.
भारताचा संघ: रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
केन विल्यमसन (C), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग