पुणे | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. या महाअंतिम लढतीाठी टीम इंडियाचे खेळाडू हे जोरदार सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ घाम गाळतेय. हा महाअंतिम सामना लंडनमधील द ओव्हल इथे होणार आहे. एका बाजूला या फायनलसाठी तयारी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या एका खेळाडूच्या घरी लगीनघाई पाहायला मिळतेय.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा टीम इंडियाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड शनिवारी 3 जून रोजी लग्नबेडीत अडकणार आहे. ऋतुराजची होणारी पत्नी ही देखील क्रिकेटपटूच आहे. ऋतुराजला क्लिन बोल्ड करणाऱ्या भावी पत्नीचं नाव उत्कर्षा पवार असं आहे. ऋतुराज आणि उत्कर्षा आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.
उत्कर्षा पवार ही सुद्धा क्रिकेटर आहे. उत्कर्षा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते. उत्कर्षाने महाराष्ट्रासलाठी 2021 मध्ये लिस्ट ए सामने खेळले आहेत. मात्र त्यानंतर तिला खेळण्याची संधी मिळाली नाही. उत्कर्षा वयाच्या 11 व्या वर्षापासून क्रिकेट खेळतेय. उत्कर्षा ही पुणेकर आहे.
ऋतुराज गायकवाड याच्या लग्नासाठीचा हळदी समारंभ 1 जून रोजी पार पडला. या समारंभादरम्यान ऋतुराज आणि उत्कर्षा या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता ऋतुराज आणि उत्कर्षाचा विवाह सोहळा हा 3 मे रोजी पार पडणार आहे. टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल्या तयारीत आहेत. त्यामुळे ऋतुराजच्या लग्नाला प्रमुख खेळाडू हजर राहू शकत नाहीत. मात्र आता अन्य खेळाडू हे लग्नाला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हळदी समारंभाचे फोटो
Mehendi of #Rutkarsha #RuturajCaughtUtkarsha #WhatAMatch pic.twitter.com/T2fZ5X5bd0
— Mansi ?✨ (@mansiwtf) June 1, 2023
ऋतुराजची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. ऋतुराज गायकवाड लग्नानंतर लंडनला उशिराने रवाना होण्यास तयार होता. मात्र टीम मॅनेजमेंटने ऋतुराजऐवजी दुसऱ्या खेळाडूची मागणी केली. त्यामुळे लग्नासाठी ऋतुराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलवर पाणी सोडावं लागलं. ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वाल याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 16 व्या मोसमात ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन करण्यात मोठी भूमिका बजावली. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून 2019 पासून चेन्नई खेळतोय. ऋतुराजला तेव्हा 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. तेव्हा ऋतुराज अपयशी ठरला. मात्र त्यानंतर ऋतुराजने सलग 3 अर्धशतक ठोकत आपण काय दर्जाचे फलंदाज आहोत, हे दाखवून दिलं.
ऋतुराजने 2021 मध्ये 16 सामन्यांत 635 धावा करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती. तेव्हा सुद्धा चेन्नईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर ऋतुराजने या 16 व्या हंगामात चेन्नईसाठी 590 धावा केल्या.
दरम्यान ऋतुराज लग्नानंतर फ्रँचायजी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. आता 18 जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होतेय. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनशी संबंधित खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतील. त्यामुळे ऋतुराज या स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.