ind vs aus : टीम इंडियाच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूवर घरातील ‘या’ व्यक्तीच्या निधनाने दु:खाचा डोंगर

| Updated on: Feb 23, 2023 | 1:38 PM

भारत- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारताच्या या क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्याला दौरा अर्धवट सोडून माघारी परतावं लागणार आहे.

ind vs aus : टीम इंडियाच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूवर घरातील या व्यक्तीच्या निधनाने दु:खाचा डोंगर
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादव यांच्या वडिलांचे बुधवारी (22 फेब्रुवारी) निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. उमेश यादवचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी आणण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उमेश यादवच्या वडिलांच्या निधनानंतर तो बॉर्डर गावस्कर मालिकेचा भाग राहण्याची शक्यता कमी आहे. तो लवकरच संघाबाहेर जाऊ शकतो. उमेश यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही आणि फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहता पुढील सामन्यांमध्येही तो स्थान मिळवू शकणार नाही अशी शक्यता आहे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी तो लवकरच घराकडे रवाना होऊ शकतो.

बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिकेमध्ये उमेश यादव याने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. उमेश यादवने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 7 बळी घेतले. यानंतर तो रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ विरुद्ध पंजाब सामन्यात खेळला. तो सामना अनिर्णित असला तरी त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही.

आता सुरू असलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील एकाही सामन्यात त्याला अद्याप संधी मिळाली नाही. उमेशने भारताकडून 54 कसोटी सामन्यात 165 बळी घेतले आहेत. उमेश पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघाचा नियमित सदस्य नाही. तो 2018 मध्ये शेवटचा वनडे आणि गेल्या वर्षी टी-20 खेळला होता.

उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर

चौथी कसोटी, 9-13 मार्च,

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.