जगाला आवडणाऱ्या किंग कोहलीला ‘हा’ खेळाडू सर्वात जास्त आवडतो, कोण आहे तो?

| Updated on: Sep 04, 2023 | 10:49 PM

Virat Kohli : कोहलीने आपल्या कारकिर्दीमध्ये काही असे विक्रम केलेत जे मोडणं अशक्य आहेत. मात्र तुम्हाला माहिती का टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला कोणता खेळाडू आवडतो? कोहलीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. 

जगाला आवडणाऱ्या किंग कोहलीला हा खेळाडू सर्वात जास्त आवडतो, कोण आहे तो?
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची जगभरातील टॉप खेळाडूंपैकी एक आहे. जगभरात विराट कोहलीचे प्रत्येक देशात तुम्हाला चाहते दिसतील. अनेक विक्रमांना गवसणी घालणारा विराट क्रिकेटच्या देवाचा म्हणजे सचिन तेंडुलकर याची शतकांचा शतक करण्याचा विक्रम मोडू शकतो. कोहलीने आपल्या कारकिर्दीमध्ये काही असे विक्रम केलेत जे मोडणं अशक्य आहेत. मात्र तुम्हाला माहिती का टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला कोणता खेळाडू आवडतो? कोहलीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

विराट कोहली याने त्याला आवडणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा खेळाडू आवडतो. वन डे फॉरमॅटमध्ये बेन स्टोक्स याने निवृत्ती घेतली होती. मात्र वर्ल्ड कपआधी त्याने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तो खेळताना दिसणार आहे.

बेन स्टोक्स याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्या त्याने 97 कसोटी सामने तर 105 वन डे सामने आणि 43 टी-20 सामने खेळलेत. यामधील कसोटीमध्ये 6117 धावा,वन डेमध्ये 2924 धावा आणि टी-20 मध्ये 585 धावा केल्या आहेत. विकेट पाहिल्या तर अनुक्रमे 97, 74 आणि 28 अशा विकेट घेतल्या आहेत. फिल्डिंग, बॅटींग आणि बॉलिंगमध्ये हा खेळाडू संघासाठी योगदान देऊ शकतो.

 

2019 साली इंग्लंड संघाने क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंड संघाकडून फायनलमध्ये विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर  बटरलच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड संघाने 2022 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. यंंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतामध्येस होणार असून अवघा एक महिन्यांचा कालावधी राहिला आहे.

दरम्यान, बेन स्टोक्स आयपीएल खेळल्यामुळे त्याला भारतामध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या संघात येण्याची संघाची ताकद आणखी वाढणार आहे. विराट कोहलीनेही त्याला आपला आवडता खेळाडू सांगितलं आहे.