मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेट विराट कोहली (Virat Kohli) सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहे. विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराटने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतून विश्रांती घेतली होती. तेव्हापासून तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. विराटने सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबतचा (Vamika Kohli) फॅमिली फोटो ट्विट केला आहे. विराटने या फोटोतून आपल्या लेकीची पहिली झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच या ट्विटमध्ये विराटने परमेश्वराचे आभार मानले आहेत. (team india cricketer virat kohli tweet his daughter photo with wife anushka sharma on beach)
विराटने वामिकाच्या जन्मापासून तिला सोशल मीडियापासून दर ठेवलंय. विराटने आपल्या लेकीची पहिली झलक दाखवलेली नाही. मात्र विराटने आता फॅमिली शेअर केलाय. हा फोटो एका चौपाटीवर आहे. या फोटोत वामिका आपल्या आईवडिलांचा अर्थात अनुष्का आणि विराटचा हात धरुन धावताना दिसतेय. हा फोटो पाठमोरा काढण्यात आलाय. विराटने हा फोटो नक्की कोणत्या बीचवरचा आहे हे विराटने सांगितलेलं नाही. विराटने ट्विट केलेल्या फोटोत पंजाबीत परमेश्वराचे आभार मानले आहेत.
“रब्बा बक्शियां तू इनियां मेहरबानियां, होर तेर तो कुछ नहीं मंगदा, बस तेरा शुक्र अदा करदां”, या कॅप्शनसह विराटने फॅमिली फोटो शेअर केला आहे. अर्थात हे परमेश्वरा तुझे खूप खूप उपकार आहेत. तुझ्याकडून मला आता काहीच नको. तुझे मी आभार मानतो.
Rabba bakshiyan tu enniyan meherbaniyan, hor terto kuch ni mangda, bas tera shukar ada kardan ???♂️❤️ pic.twitter.com/FuOGkjkBYD
— Virat Kohli (@imVkohli) January 9, 2023
विराट आणि अनुष्का नुकतेच नीम करौली बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. तिथेही वामिका त्यांच्यासोबत होती. याआधी विराट मथुरा-वृंदावनमध्ये देवदर्शनाला गेला होता. तिथे विराटने बाके बिबारी मंदिरात दर्शन घेतलं. तसेच बाबा नीम ककोरी आश्रमातही गेला होता.
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेचा टी 20 मालिकेत 2-1 ने पराभव केला. त्यानंतर आता 10 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. विराट टी 20 मालिकेचा भाग नव्हता. मात्र या एकदिवसीय मालिकेतून विराट पुन्हा एकदा कमबॅक करेल. या नववर्षात क्रिकेट चाहत्यांना विराटकडून विराट खेळीची अपेक्षा असेल.