मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत नेपाळ विरुद्ध भारत यांच्यात सामना सुरु आहे. हा सामना नेपाळसाठी करो या मरो असा आहे. कारण हा सामना हरला तर थेट स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे, भारताने हा सामना जिंकला तर थेट सुपर फोरमध्ये एन्ट्री मिळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह या सामन्यात नसून त्याऐवजी मोहम्मद शमी याला स्थान मिळालं आहे. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन क्रीडाप्रेमींना घडलं. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीवर झेल सोडले. अगदी सोपे झेल सोडल्याने दोन्ही गोलंदाजांनी संताप व्यक्त केला आहे.
मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुशल भुर्तेल स्ट्राईकला होता. मोहम्मद शमीन 132 कीमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. हा चेंडू त्याच्या बॅटला लागून थेट श्रेयस अय्यरच्या हाती गेला. मात्र हा झेल घेणं त्याला जमलं नाही आणि भुर्तेल याला जीवदान मिळालं. त्यानंतर मोहम्मद सिराज दुसरं षटक घेऊन आला तेव्हा आसिफ शेख स्ट्राईकला होता. सिराजने 133 किमी प्रतितास वेगाने टाकलेला चेंडू आसिफ शेखन आउटसाईड ऑफ चेंडू फटकावला. हा चेंडू थेट विराट कोहलीच्या हाती होता. पण त्यानेही हा झेल सोडला.
3 Dropped Catches 😱 #IndvsNep pic.twitter.com/LQOnqv3yEN
— Susanta Sahoo (@ugosus) September 4, 2023
Shreyas and Virat Kohli already dropped a simple Catches and its has just been 2 overs 🙆🤦 #INDvsNEP pic.twitter.com/2sSK5BAK2l
— 𝐕𝐢𝐫𝐚𝐣 (@Chole_Chawal) September 4, 2023
India already Dropped Two Catches against Nepal, Feeling the Pressure🤦♂️.#NEPvIND #AsiaCup2023 #INDvsNEP pic.twitter.com/xNzsDDzMn4
— Shaharyar Ejaz 🏏 (@SharyOfficial) September 4, 2023
मोहम्मद शमीच्या पाचव्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा झेल सोडला. दुसऱ्या चेंडूवर बॉल थेट बॅटला लागून थेट इशान किशनच्या हाती चेंडू होता. मात्र त्यानेही झेल सोडला आणि चौकार गेला. गचाळ क्षेत्ररक्षण पाहून भारतीय समालोचकांनीही संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर भारताच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर टीमची बांधणी केली जात आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी