वन डे वर्ल्ड कप हरल्यापेक्षा या देशाविरूद्धची मालिका गमावल्याचं दु:ख कायम राहणार, राहुल द्रविडचा मोठा खुलासा

| Updated on: Aug 10, 2024 | 8:49 PM

टीम इंडियाचा माजी कोच राहिलेल्या राहुल द्रविड पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. राहुल द्रविडने टीम इंडियाचा कोच असताना वन डे वर्ल्ड कप हरल्यापेक्षा जास्त त्याला एका देशाविरूद्धची मालिका गमावल्यावर वाईट वाटल्याचं सांगितलं आहे. कोणता देश आणि मालिका इतकी का महत्त्वाची ते जाणून घ्या.

वन डे वर्ल्ड कप हरल्यापेक्षा या देशाविरूद्धची मालिका गमावल्याचं दु:ख कायम राहणार, राहुल द्रविडचा मोठा खुलासा
Rohit Sharma-Rahul dravid
Image Credit source: PTI
Follow us on

टीम इंडियाच माजी कोच राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुल द्रविड याने टीम इंडियाच्या कोचपदाची नोव्हेंबर 2021 ते जून 2024 पर्यंत जबाबदारी पार पाडली. टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यावर टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी गौतम गंभीर याच्याकडे सोपवली गेली होती. राहुल द्रविज कोच असताना टीम इंडियाने आयसीसीच्या तीन फायनलमध्ये धडक मारली. मात्र यामधील फक्त टी-20 वर्ल्ड कपमध्येच विजेतेपद जिंकता आलं होतं. वन डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा घरच्या मैदानावर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. सर्व भारतीयांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, अशातच राहुलने तो कोच असताना सर्वात जास्त वाईट कोणता सामना हरल्यावर वाटलं? यावर बोलताना त्याने एकही आयसीसी ट्रॉफीच्या जिंकण्यापासून एक पाऊल दूर असलेला सामना सांगितला नाही.

राहुल द्रविड काय म्हणाला?

दक्षिण आफ्रिकेमध्ये टीम इंडियाने कधीच मालिका जिंकली नव्हती. त्यामुळे ती मालिक जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकत नव्हता. पण आम्ही विजयाच्या जवळ होतो. माझ्यासाठी कोच म्हणून हा सर्वात कठीण काळ होता कारण मालिकेत पुढे असूनही आम्ही विजयापासून वंचित राहिलो, पण तिथून खूप काही शिकायला मिळाल्याचं राहुल द्रविड म्हणाला.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका गमावल्याने सर्वात जास्त वाईट वाटल्याचं राहुल द्रविड म्हणाला. टीम इंडिया 2021 मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी गेली होती. या मालिकेमध्ये पहिला सामना जिंकत आघाडी घेतल्यावरही आफ्रिकेने 2-1 ने मालिका जिंकली होती. भारताने पहिली कसोटी 113 धावांनी जिंकली पण त्यानंतरच्या दोन्ही कसोटी सामन्यात सात विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाचा हेड कोच म्हणून राहुल द्रविड याचा तो पहिलाच विदेश दौरा होता. त्यासोबतच विराट कोहलीची कर्णधार म्हणून शेवटची कसोटी मालिका होती.

दरम्यान, राहुल द्रविड कोच असताना टीम इंडियाने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता. विराट कोहली कॅप्टन असताना पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने प्रवेश केला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सामना जिंकला. त्यानंतर भारतामध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप फायनल सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये हरवलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं.