विनोद कांबळी 14 वेळा नशामुक्ती केंद्रात, रिहॅबची नक्की कुणाला गरज असते? तज्ज्ञ काय म्हणतात?

| Updated on: Dec 24, 2024 | 3:53 PM

Vinod Kambli Health : टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज आणि सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विनोद कांबळी 14 वेळा नशामुक्ती केंद्रात, रिहॅबची नक्की कुणाला गरज असते? तज्ज्ञ काय म्हणतात?
vinod kambli cricketer
Follow us on

दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांचा शिष्य, सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांचं आरोग्य हे गेल्या काही आठवड्यापासून चर्चेचा विषय आहे. आचरेकर सरांच्या स्मृती शिल्पाच्या उद्घाटनावेळेस विनोद कांबळीची अवस्था साऱ्या देशाने पाहिली. तेव्हापासून कांबळीची आणि त्याच्या आरोग्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता काबंळीची प्रकृती बिघडल्याने 23 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कांबळीला आधीपासूनच काही आजार होते. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी बिघडली आहेत. कांबळीला हृदयविकाराचा झटकाही आला आहे. कांबळीने गेल्या काही काळात नको त्या गोष्टींच्या आहारी गेल्याने तब्येतीवर परिणाम झाल्याचं म्हटलं जातं. अशात कांबळी 1-2 नाही तर तब्बल 14 वेळा नशामुक्ती केंद्रात (रिहॅब) गेल्याचं त्याचे मित्र आणि फर्स्ट क्लास अंपायर मार्क्स कुट्टो यांनी सांगितलं होतं.

आता हे रिहॅब म्हणजे नक्की काय? रिहॅबला जाण्याची कुणाला गरज असते रुग्णांना खरंच रिहॅब करण्याची गरज असते का? याबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलंय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

“कोणत्याही व्यक्तीला असलेलं व्यसन सोडवण्यासाठी नशामुक्ती केंद्रात पाठवलं जातं. ज्यांना आजार आहे तसेच व्यसनही आहे, अशांवर रिहॅब सेंटरमध्ये उपचार केले जातात. रिहॅबमध्ये गेल्याने संबंधित व्यक्तीला असलेलं व्यसन कमी होण्याची शक्यता अधिक असते. विविध उपचारांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या व्यसनावर नियंत्रण मिळवता येतं”, अशी माहिती दिल्लीच्या लेडी हार्डिंज हॉस्पिटलमधील मेडीसिन विभागाच्या डॉ. एलएच घोटेकर यांनी दिली.

“नशामुक्ती केंद्र म्हणा किंवा रिहॅब, इथे विविध टप्प्यांमध्ये उपचार केले जातात. पहिल्या टप्प्यात संबंधित व्यक्तीची स्थिती जाणून घेतली जाते. व्यसन आणि मेडीकल हिस्ट्रीनुसार उपचार केले जातात. व्यसन आणि तीव्रतेबाबत माहित झाल्यानंतर संबंधिताच्या शरीराला डीटॉक्स केलं जातं. त्यानंतर औषधं आणि समुपदेशन केलं जातं”, असंही घोटेकर यांनी नमूद केलं.

समज गैरसमज

“नशामुक्ती केंद्र म्हटलं की तिथे फक्त व्यसन सोडवण्यासाठीच जातात, असा गैरसमज अनेकांचा आहे. मात्र तसं नाही. रिहॅबचे अनेक प्रकार आहेत. ड्रग्स रिहॅब सेंटरमध्ये नशामुक्तीसाठी उपचार केले जातात. सामन्य रिहॅब सेंटरमध्ये स्ट्रोक आणि हॉर्ट डीसीस या व्याधी असलेल्यांना दाखल केलं जातं. तसेच शस्त्रक्रियेनंतर रिकव्हर होण्यासाठी रिहॅबमध्ये पाठवलं जातं.सामन्य रिहॅब सेंटर हे शासकीय रुग्णालयांमध्ये असतात”, असंही घोटेकर यांनी स्पष्ट केलं.

दुखापतीनंतर तसेच शस्त्रक्रियेनंतर त्यातून पूर्णपणे फिट होण्यासाठी रिहॅबमध्ये पाठवण्यात येतं. रिहॅब सेटंरमध्ये रुग्णांवर आहार, दिनचर्या, औषध, या सर्व बांबीवर काटेकोरपणे लक्ष दिलं जातं. तसेच आवश्यक ते सर्व काही इथं केलं जातं.

रिहॅबचा कालावधी किती?

अनेक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रिहॅब पार पडतं. साधारणपणे 28 दिवस ते दीड महिन्यांचा रिहॅब कालावधी असतो. अपवादा‍त्मक स्थितीत तसेच गरजेनुसार हा कालावधी कमी जास्त असू शकतो.