मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कप 2023 वर सर्वांच्या नजरा लागून आहेत. भारताकडे वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद असल्याने भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप असल्याने भारतीय खेळाडूसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. आता सुरू असलेली भारत-ऑस्ट्रेलिया मालिका भारतीय खेळाडूंनी खिशात घातली आहे. अशातच आजी-माजी खेळाडू भविष्यावाणी करत आहेत. अशातच माजी खेळाडू इरफान पठान याने सेमी फायनलमधील चार संघांची नाव सांगितली आहेत.
5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये दहा संघ एकमेकांना भिडणार आहेत. भारतात वर्ल्डकपमध्ये असल्याने भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. इरफान पठाण याच्या मते सेमी फायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चार संघ धडक मारणार आहेत. चारही संघ तोडीस तोड आहेत.
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार असून 8 ऑक्टोबरला पार पडणार आहे. तर वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड वि. न्यूझीलंड यांच्यात पार पडणार असून थराराला सुरूवात होणार आहे. बीसीसीआयनेही जय्यत तयारी केली आहे. देशभरातील सर्व नामांकित स्टेडिअममध्ये सामने होणार आहेत. मात्र यंदाच्या वर्ल्ड कप सामन्यांवर पावसाचं सावट असणार आहे.
दरम्यान, इरफान पठाण हा भारताने 2007 साली जिंकलेल्या टी-20 वर्ल्ड कप संघाचा खेळाडू आहे. इरफान पठाण या समालोचन करताना दिसतो. भारताकडून कसोटीमध्ये पाकिस्तानविरूद्ध त्याने हॅट्रिक घेतली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण यांनी कमाल कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रोहित शर्मा(C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (VC), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव