रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने 13 वर्षांची आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात 7 धावांनी पराभूत करत 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप आणि 13 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20I क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. विराट आणि रोहितचा टीम इंडियासोबतचा टी20 मधील प्रवास संपला. तसेच यासह टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक यांचीही कारकीर्द संपली. द्रविड यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाला 2 आयसीसी फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे द्रविड यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र द्रविड यांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून देत ऐतिहासिक आणि अविस्मरणीय निरोप घेतला.
राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 6 मालिका जिंकल्या आहेत. तर 1 मालिकेत पराभूत व्हावं लागलं तर 1 सीरिज ड्रॉ झाली. तसेच या दरम्यान टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी गमावली. तसेच टीम इंडियाला wtc final मध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने 24 पैकी 14 सामने जिंकले, 7 सामने गमावले आणि तर 3 ड्रॉ झाले.
टीम इंडियाने 2023 साली आशिया कप जिंकला. मात्र आयसीसी स्पर्धेत टीम इंडिया अपयशी ठरली. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनल, wtc final आणि odi wc 2023 final मध्ये पराभूत व्हावं लागलं. मात्र राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा अखेरचा दिवस हा अविस्मरणीय ठरला. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने या विजयासह राहुल द्रविड यांना विजयी आणि अविस्मरणीय निरोप दिला.
द्रविड गुरुजींना वर्ल्ड कप ट्रॉफीसह निरोप
𝗗𝗿𝗲𝗮𝗺 𝗙𝗶𝗻𝗶𝘀𝗵! ☺️ 🏆
Signing off in a legendary fashion! 🫡 🫡
Congratulations to #TeamIndia Head Coach Rahul Dravid on an incredible #T20WorldCup Campaign 👏👏#SAvIND pic.twitter.com/GMO216VuXy
— BCCI (@BCCI) June 29, 2024
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळने राहुल द्रविड यांचे 2 खास फोटो पोस्ट केले होते. द्रविड या फोटोंमध्ये थंब्स दाखवत आहेत. तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.