मुंबई | अखेर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. आयसीसी वनडे मेन्स वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा 5 ऑक्टोबरपासून श्रीगणेशा होणार आहे. तर फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. पहिला आणि शेवटचा अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच खेळवण्यात येणार आहे. एकूण 46 दिवस क्रिकेट चाहत्यांना फुल्ल ऑन थरार अनुभवता येणार आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध उपविजेत्या न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दरम्यान आपण यजमान टीम इंडियाच्या सामन्यांचं सविस्तर वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया एकूण 9 सामने खेळणार आहे. भारताचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना चेन्नईत 8 ऑक्टोबरला आयोजित केला गेला आहे. तर बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाक ही मॅच 15 ऑक्टोबरला होणार आहे. हा महामुकाबला नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच खेळवण्यात येणार आहे.
?? v ??
Date and venue for the highly-anticipated clash between India and Pakistan at the ICC Men's Cricket World Cup 2023 ?#CWC23 https://t.co/TZlm0sZBwP
— ICC (@ICC) June 27, 2023
Indian team schedule for World Cup 2023:
IND vs AUS, Oct 8, Chennai
IND vs AFG, Oct 11, Delhi
IND vs PAK, Oct 15, Ahmedabad
IND vs BAN, Oct 19, Pune
IND vs NZ, Oct 22, Dharamsala
IND vs ENG, Oct 29, Lucknow
IND vs Qualifier, Nov 2, Mumbai
IND vs SA, Nov 5, Kolkata
IND vs… pic.twitter.com/glcHxzolae— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2023
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.
टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.
वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरला तर शेवट 19 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना म्हणजेच शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. एकूण 10 संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने हा वर्ल्ड कप पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीम ही 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 या हिशोबाने एकूण 9 मॅच खेळणार आहे.
या 10 संघामधून पहिले 4 संघ हे सेमी फायनलमधील पोहचतील. सेमी फायनलचे 2 सामने हे मुंबईतील वानखेडे आणि कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. पहिली सेमी फायनल मॅच बुधवारी 15 नोव्हेंबर आणि दुसरी सेमी फायनल मॅच 16 नोव्हेंबरला पार पडेल. तर फायनल मॅच रविवारी 19 नोव्हेंबरला होईल.