मुंबई | क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या वेळापत्रकाची प्रतिक्षा होती. वेळापत्रक केव्हा केव्हा जाहीर होणार, टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये असणार, हा आणि असे अनेक प्रश्न चाहत्यांना होते. अखेर आयसीसीने 5 जानेवारी रोजी स्पर्धेच्या 6 महिन्यांआधी वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत एकूण 29 दिवसांमध्ये 55 सामने 9 स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.
स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 29 जूनला अंतिम सामना पार पडणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा 1 जून रोजी यूएसए विरुद्ध कॅनेडा यांच्यात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण सहभागी 20 संघांना 4-4 प्रमाणे 5 गटात विभागण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धेतील सर्व सामने पार पडणार आहेत. या वर्ल्ड कप निमित्ताने आपण टीम इंडियाच्या सर्व सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
आयसीसीने टीम इंडियाला ए ग्रुपमध्ये ठेवलं आहे. टीम इंडियासह आयर्लंड, पाकिस्तान, यूएसए आणि कॅनेडा हे संघ ए ग्रुपमध्ये आहे. प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील उर्वरित 4 संघां विरुद्ध खेळेल. प्रत्येक ग्रुपमधून अव्वल 2 संघ हे सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमी फायनल आणि मग फायनलसाठी टीम निश्चित होतील.
टीम इंडियाचे सर्व सामने यूएसएत
📢 Announced!
Take a look at #TeamIndia‘s group stage fixtures for the upcoming ICC Men’s T20 World Cup 2024 👌👌
India will play all their group matches in the USA 🇺🇸#T20WorldCup pic.twitter.com/zv1xrqr0VZ
— BCCI (@BCCI) January 5, 2024
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 5 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना हा 9 जून रोजी होणार आहे. या सामन्यात 2 चीर प्रतिद्वंदी भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हा सामना होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना हा यूएएसए विरुद्ध 12 जून रोजी रोजी होईल. तर 15 जून रोजी टीम इंडियाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना हा कॅनेडा विरुद्ध होईल. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचे हे 4 सामने यूएसएतच होणार आहेत.