IND vs AFG | चहलला टीम इंडियामध्ये जागा न मिळण्यासाठी हा बडा खेळाडू जबाबदार, धोनीचा होता खास

| Updated on: Jan 10, 2024 | 11:35 PM

टीम इंडियाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल याला कित्येक दिवस संघात जागा मिळाली नाही. मात्र यासाठी एक खेळाडू जबाबदार असल्याचा दावा आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने केला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

IND vs AFG | चहलला टीम इंडियामध्ये जागा न मिळण्यासाठी हा बडा खेळाडू जबाबदार, धोनीचा होता खास
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये तीन सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ निवडला असून घोषणाही केली आहे. मात्र एका स्टार खेळाडूची संघात निवड झाली नाही. आगामी वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडिया एकमेव मालिका खेळणार आहे. या स्टार खेळाडूला संघात न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. कारण या खेळाडूमध्ये एकट्याच्या दमावर सामना पालटवण्याची क्षमता आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युजवेंद्र चहल आहे. खराब फॉर्ममुळे चहल बाहेर गेला असं वाटत नाही. मात्र त्याला संघात परत कमबॅक करता आलं नाही. वर्ल्ड कप आधी आयपीएलमध्ये चहलने दमदार प्रदर्शन केलं तर त्याला वर्ल्ड कप संघात येण्याची संधी आहे. जूनमध्ये अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप संघातही त्याला आपली जागा मिळवायला मेहनत आणि चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

इम्रान ताहिरचं मोठं वक्तव्य

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी खेळाडू इम्रान ताहिर याने चहलला संघात स्थान न भेटण्यामागे एका खेळाडूचं नाव घेतलं आहे. कुलदीप यादवमुळे त्याला संघात जागा नाही मिळाली. चहल चांगली कामगिरी करत होता. परंतु कुलदीप यादव हा तुफान फॉर्ममध्ये असल्याने त्याला प्राधान्य दिलं गेलं.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.