IND vs ENG | टीम इंडियाला मोठा धक्का, चौथ्या सामन्यातून हा खेळाडू बाहेर!

| Updated on: Feb 20, 2024 | 7:56 PM

India vs England 4th Test | टीम इंडियाच्या गोटातून चौथ्या कसोटी सामन्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी आणि स्टार खेळाडू चौथ्या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs ENG | टीम इंडियाला मोठा धक्का, चौथ्या सामन्यातून हा खेळाडू बाहेर!
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 434 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. टीम इंडियाचा या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने यासह 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. टीम इंडियाने विराट कोहली, मोहम्मद शमी, केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंच्या मदतीने हा सामना जिंकला. टीम इंडियाच्या चाहत्यांना आता चौथ्या कसोटीआधी केएल राहुलच्या कमबॅकची प्रतिक्षा आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

नक्की काय झालं?

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून टीम इंडियाचा उपकर्णधार आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला विश्रांती देणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळातील अनेक क्रिकेट स्पर्धा पाहता बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 23 फेब्रुवारीपासून रांचीत चौथा कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघ रांचीत दाखल झाले. टीम इंडियासोबत जसप्रीत बुमराह नव्हता. त्यामुळे बुमराह निश्चितच चौथ्या सामन्यात खेळणार नसल्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान टीम इंडियाने वर्कलोड मॅनेजमेंटनुसार इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या कसोटीनंतर सिराजला दुसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी मुकेश कुमार याचा समावेश करण्यात आला होता. आता चौथ्या कसोटीत बुमराहच्या जागी मुकेश कुमार आणि आकाश दीप या दोघांमधून कुणाला संधी मिळणार? याकडे लक्ष असणार आहे.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.