इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये मोठी झेप

| Updated on: Feb 16, 2021 | 4:08 PM

टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) रॅंकिगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये मोठी झेप
टीम इंडिया
Follow us on

चेन्नई : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 317 धावांच्या (Team India vs England 2nd Test) मोठ्या फरकाने पराभव केला. यासह पहिल्या पराभवाचा वचपा काढला. या विजयाचा टीम इंडियाला दुहेरी फायदा झाला आहे. भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. तर मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या रॅकिंगमध्ये (ICC World Test Championship) फायदा झाला आहे. (team india jump 2nd position in icc world test Championship )

टीम इंडियाची दुसऱ्या क्रमांकावर झेप

टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 च्या रॅकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. या मोठ्या अंतराने विजय मिळवल्याने भारताला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर या पराभवामुळे इंग्लंडला मोठा धक्का लागला आहे. इंग्लंडची दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. एकूणच या सामन्याच्या निकालामुळे टीम इंडियाला फायदा तर इंग्लंडला तोटा झाला आहे.

दरम्यान या फेरबदलामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्साठीची चुरस आणखी रंगतदार झाली आहे. न्यूझीलंडने आधीच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी एकाच संघाला संधी आहे. तर स्पर्धेत टीम इंडिया, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात कोण खेळणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

अंतिम सामन्यात पोहचण्यासाठीचे समीकरण

जागा 1 आणि टीम 3 अशी रंगतदार स्थिती असल्याने प्रत्येक संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. या फायनल मध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटींमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. किंवा 1 सामना अनिर्णित राखून एका मॅचमध्ये विजय मिळवावा लागेल. तर इंग्लंडला अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी उर्वरित 2 सामने जिंकणं बंधनकारक असणार आहे.

तर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य हे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेवर अवलंबून असणार आहे. या मालिकेतील उर्विरित 2 सामन्यांपैकी प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकल्यास किंवा दोन्ही सामने ड्रॉ व्हावे, अशी इच्छा ऑस्ट्रेलियाची असणार आहे. किंवा एक सामना बरोबरीत राखून दुसरा सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियासाठी आशा कायम राहतील. एकूणच ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी ही अगदी जर तरची आहे.

दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना हा अहमदाबदमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा तिसरा सामना डे नाईट असणार आहे.

संबंधित बातम्या :

Axar Patel | मॅकेनिकल इंजिनियर बनण्याचं स्वप्न, नववीत असताना क्रिकेटच वेड, आता 42 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

कॅप्टन कुलच्या ‘या’ रेकॉर्डवर विराट कोहलीचा डोळा, तिसऱ्या कसोटीत धोनीला पछाडणार?

(team india jump 2nd position in icc world test Championship)