आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया या मोहिमेतील सुरुवात 20 फेब्रुवारीपासून करणार आहे. टीम इंडिया पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. तर टीम इंडिया चॅमियन्स ट्रॉफीआधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. बीसीसीआय निवड समिती इंग्लंड विरूद्धच्या मालिकांसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लवकरच संघाची घोषणा करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही अंतिम तारीख आहे.
त्यामुळे आता निवड समिती चॅम्पिन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कुणाला संधी देणार आणि कुणाला वगळणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. या दरम्यान अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात टीम इंडियाबाबत काही दावे केले जात आहेत. रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा विकेटकीपर केएल राहुल याला संधी मिळणार असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे.
टीओआयनुसार, निवड समिती केएल राहुल याला संधी देण्याबाबत सकारात्मक आहे. मात्र केएलला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i आणि वनडे सीरिजमधून विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंड विरुद्ध 5 टी 20i आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीकडून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांचा समावेश केला जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल 1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल 2, 5 मार्च, लाहोर
अंतिम सामना, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, यशस्वी जायसवाल, रवींद्र जडेजा आणि नीतीश कुमार रेड्डी.