मुंबई | इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यातील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशालेत खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील 5 वा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. टीम इंडियाने रांचीतील चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाचा पाचवा सामन्यात विजय मिळवून मालिका एकतर्फी फरकाने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू पाचव्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हा खेळाडू दुखापतीमुळे गेल्या 3 सामन्यात खेळू शकला नाही. त्यात आता पाचव्या सामन्यातही खेळणार नसल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. केएल राहुल दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार,केएल राहुल पूर्णपणे फिट नाही. केएल उपचारांसाठी लंडनला रवाना झाला आहे. केएल अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे केएल लंडनमधील तज्ज्ञाकडून सल्ला घेत आहे.
केएल राहुल हैदराबादमधील पहिल्या कसोटीत खेळला होता. मात्र त्यानंतर केएलला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीनंतर उर्वरित सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यात केएलचा समावेश करण्यात आला. मात्र केएलसाठी फिटनेस टेस्ट बंधनकारक केली. केएल चौथ्या सामन्यापर्यंत फिट होऊ शकला नाही. त्यामुळे आता पाचव्या सामन्यातही तो खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का, केएल ‘आऊट’
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s squad for the 5th @IDFCFIRSTBank Test against England in Dharamsala announced.
Details 🔽 #INDvENG https://t.co/SO0RXjS2dK
— BCCI (@BCCI) February 29, 2024
टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप
टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.