टीम इंडिया येण्याच्या 15 मिनिटेआधीच मुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना फोन, काय म्हणाले?

| Updated on: Jul 04, 2024 | 8:18 PM

CM Eknath Shinde Call CM Shinde : टीम इंडिया काही वेळातच मरीन ड्राईव्हवर दाखल होणार आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतान एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना का फोन केला ते जाणून घ्या.

टीम इंडिया येण्याच्या 15 मिनिटेआधीच मुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना फोन, काय म्हणाले?
Follow us on

टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर मोठा जनसागर आलेला पाहायला मिळत आहे. टीम इंडियासाच्या शिलेदारांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही प्रचंड झालीये. ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघण्यासाठी काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. टीम इंडियाचा ताफा विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे निघाला आहे. हा ताफा पोहोचण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना फोन फिरवला आहे. हा फोन का केला जाणून घ्या.

टी-20 वर्ल्ड कप विनर टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरीन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.

टीम इंडियाच्या चाहत्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी संपूर्ण परिसर भरला गेला आहे. रोहितचे चाहते त्यासाठी मुंबईचा राजा रोहित शर्मा असं म्हणून घोषणाबाजी करत आहेत. एकीकडे सुमद्राच्या भरतीच्या लाटा आणि आणि दुसरीकडे चाहत्यांनी संपूर्ण परिसर गजबजून गेलाय. पोलीस प्रशासनाकडून मरीन ड्राईव्हकडे जाऊ नका असं आवाहन पोलीस प्रशासन करत आहेत.

दरम्यान, टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. महेंद्र सिंह धोनीनंतर रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे ज्याने आपल्या नेतृत्त्वात टीमला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.  टीम इंडियाकडे आता चार वर्ल्ड कप असून त्यामध्ये दोन टी-20 आणि दोन वन डे वर्ल्ड कप चा समावेश आहे.