मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून 2023 या वर्षासाठी क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. तसेच इतर खेळाडूंनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. तसेच तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. दरम्यान संबंधित खेळाडूने वर्षभर केलेल्या कामगिरीच्या जोरावर संबंधित खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली जाते.
19 विविध खेळांमधील 28 खेळाडूंची अर्जुन आणि खेळरत्न पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. मोहम्मद शमी याच्यासह एकूण 26 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध खेळातील मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे. तसेच बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना खेळ रत्न पुरस्कारने सन्मानित केलं जाणार आहे. या दोघांनी भारताचं नाव जगभरात गाजवलंय. चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत या जोडीने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार हा गेल्या 4 वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केली. शमीने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम केला. मोहम्मद शमी एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयने शमीच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार शमीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार?
Ministry of Youth Affairs & Sports announces National Sports Awards 2023
President of India will give away the awards on 09th January 2024
📙https://t.co/pF5Kbrplwo@YASMinistry @Anurag_Office @ddsahyadrinews @airnews_mumbai
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 20, 2023
पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात करण्यात आलं आहे. या पुरस्कार वितरण सोहळा 9 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे.