मुंबई | भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात बदल केला आहे. टीम इंडियाचा संयमी फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर पडला आहे. तर चौथ्या सामन्यातील विश्रांतीनंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं पुनरागमन झालं आहे. तसेच रणजी ट्रॉफी सेमी फायनलसाठी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला मुक्त केलं आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही सर्व माहिती दिली आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतील 4 सामने झाले आहेत. टीम इंडियाने पहिला सामना गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने सलग तिन्ही सामने जिंकून मालिकाही जिंकली. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा धर्मशाला येथे पार पडणार आहे. पाचवा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची सूत्रं आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाच बॉलर मोहम्मद शमी याच्याबाबतही माहिती दिली आहे.
मोहम्मद शमी याच्यावर 26 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया पार पडली. शमीने सोशल मीडियावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती दिली. शमीला आयसीसी वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून शमी टीम इंडियातून बाहेर आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे शमी आयपीएलमधूनही बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात बीसीसीआयने मोठी अपडटे दिली आहे.
मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s squad for the 5th @IDFCFIRSTBank Test against England in Dharamsala announced.
Details 🔽 #INDvENG https://t.co/SO0RXjS2dK
— BCCI (@BCCI) February 29, 2024
“मोहम्मद शमीच्या उजव्या टाचांच्या समस्येवर 26 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली . शमी आता बरा होत आहे, तो लवकरच रिहॅबला सुरुवात करेल. त्यासाठी शमी बंगळुरूतील एनसीएत रवाना होईल”, अशी माहिती बीसीसीआयने दिली. आता शमी आयपीएलमध्ये खेळणार की थेट टी 20 वर्ल्ड कपसाठीच फिट होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.