मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने किंवींना फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाचा डाव 273 धावांवर आटोपला. भारताच्या गोलंदाजांनी शेवटला दमदार कमबॅक करत किंवींना 300 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. न्यूझीलंड संघाकडून डॅरिल मिशेल याने नाबाद शतकी खेळी केली. तर भारताकडून आज पहिलाच सामना खेळत असलेल्या मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत.
न्यूझीलंड संघाची खराब सुरूवात झाली होती, ओपनर डेव्हॉन कॉनवे याला मोहम्मद सिराजने शून्यावर माघारी पाठवलं. पाठोपाठ विल यंगला 17 धावांवर शमीने बोल्ड केलं. त्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिशेल यांनी मजबूत भागीदारी केली. दोघांनीही यश मिळवनू दिलं नाही आणि धावसंख्येची गतीही वाढवली.
मोहम्मद शमी याने ही जोडी फोडत रचिन रवींद्र याला 75 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर किवींचा डाव गडगडला. शेवटच्या दहा ओव्हरमध्ये न्यूझीलंड संघाच्या 6 विकेट गेल्या, मोहम्मद शमी याने पंजा पूर्ण केला. तर न्यूझीलंड संघाचा डॅरिल मिशेल याने शतकी खेळी करत एक बाजू लावून धरली होती. डॅरिल मिशेल मोठा फटका मारण्याच्या नादात १३० धावांवर आऊट झाला. मिशेल या खेळीमध्ये ९ चौकार आणि ५ षटकार मारले.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट