भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर झिंबाब्बे दौरा केला. या झिंबाब्वे दौऱ्यात बहुतांश युवा खेळाडूंची निवड करण्यात आली. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत युवा खेळाडूंसमोर झिंबाब्वेचं आव्हान होतं. झिंबाब्वेने पहिल्याच सामन्यात टीम इंडियावर मात करत विजयी सलामी दिली. त्यामुळे टीम इंडियाला कडवं आव्हान मिळणार, हे निश्चित झालं होतं. मात्र शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने सलग 4 सामने जिंकले. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावावर केला.
टीम इंडियाच्या चाहत्यांना आता झिंबाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या पुढील मालिकेची प्रतिक्षा आहे. टीम इंडियाची पुढील मालिका कोणत्या संघाविरुद्ध असणार? टीम इंडिया या मालिकेसाठी दौऱ्यावर जाणार की मायेदेशातच खेळणार ? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत. क्रिकेट चाहत्यांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया झिंबाब्वेनंतर आता शेजारी श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौरा करणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात एकूण 2 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्याची सुरुवात टी 20i ने तर सांगता वनडे सीरिजने करणार आहे. उभयसंघात दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाच्या या दौऱ्याी सुरुवात 27 जुलैपासून होणार आहे.
श्रीलंके विरूद्धच्या टी 20i आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच बीसीसीआय निवड समिती भारतीय संघाची घोषणा करणार आहे. आता निवड समिती कुणाला संधी देते आणि कुणाला डच्चू? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
श्रीलंका विरुद्ध इंडिया टी 20-वनडे सीरिजचं शेड्यूल
UPDATE 🚨
A look at the revised schedule for #TeamIndia‘s upcoming tour of Sri Lanka #SLvIND pic.twitter.com/HLoTTorOV7
— BCCI (@BCCI) July 13, 2024
दरम्यान गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यातून खेळाडूनंतर एक कोच म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. गंभीर टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि वनडे 2011 वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता. तसेच गंभीरने आपल्या नेतृत्वात 2012 आणि 2014 साली केकेआरला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. तसेच 10 वर्षांनी मेंटॉर म्हणून पुन्हा एकदा केकेआरला चॅम्पियनं केलं. त्यानंतर आता गंभीर टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी सांभाळणार आहे. आता गंभीर टीम इंडियाला कसं मार्गदर्शन करतो? हे देखील पाहणं औतसुक्याचं ठरणार आहे.