लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू उतरला, मोठी जबाबदारी सांभाळणार!

| Updated on: Feb 19, 2024 | 8:58 PM

लोकसभा निवडणुकीआधी देशात सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. पक्षामध्ये मोठ्या चेहऱ्यांना घेऊन काही पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केलीये. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू उतरला, मोठी जबाबदारी सांभाळणार!
Follow us on

नवी दिल्ली | लोकसभा निवडणूकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या तारखा जाहीर होण्याआधी देशात सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400  पारचा नारा दिला आहे. तर भाजपला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी विरोधक एकत्र आलेत. मात्र जागावाटप होईपर्यंत काही सांगता येत नाही. ‘इंडिया’मध्ये आधीच फुट पडलेली पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांनी स्वबळावर  लढणार असल्याचं सांगितलं आहे. सर्व पक्ष राजकीय आखाड्यात उतरण्याआधी ताकद लावत आहत. अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिलवर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

नेमक कोणती जबाबदारी?

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये शुबमन गिल सुरूवातीला फॉर्मशी झगडत होता. मात्र त्याने शतक ठोकत जबरदस्त कमबॅक केलं होतं. शुबमन गिल याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाने भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘स्टेट आयकॉन’ बनवलं आहे.

शुबमन गिल याला स्टेट ऑयकॉन देण्यामागे मतदारांमध्ये जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी सिबिन यांनी सांगितलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 13 जागांसाठी 65.96 टक्के मतदान झाले होते. आता राज्यातील मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांच्या पुढे नेण्याचं टार्गेट असल्याचंही सिबिन म्हणाले.

दरम्यान, लोकप्रिय पंजाबी गायक तरसेम जस्सर याची याआधी स्टेट आयकॉन म्हणून निवड केली गेली होती. शुक्रवारी पंजाबच्या सर्व उपायुक्तांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना गेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असलेले भाागांची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. शुबमन गिल गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा मुख्य ओपनर म्हणून टीममध्ये खेळत आहे. आता झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्येही त्याचा समावेश होता. आगामी आयपीएलमध्ये गिल हा गुजरात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पडणार आहे.