मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेली टी-20 मालिका रोहित अँड कंपनीने खिशात घातली. तिन्ही सामने जिंकत अफगाणिस्तान संघाला व्हाईटवॉश दिला. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इडियाची ही शेवटची मालिका होती. आता आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच संघ निवडला जाणार यात काही शंका नाही. या मालिकेत रिंकू सिंहने छाप पाडत टी-20 वर्ल्ड कप संघातील आपली जागा जवळपास पक्की केली आहे. रिंकूने शेवटच्या सामन्याता दमदार अर्धशतकी खेळी करत फिनिशर असल्याचं दाखवून दिलं. सर्वत्र रिंकूचं कौतुक सुरू असताना आर. अश्विन याने मोठा खुलासा केला आहे.ॉ
आर. अश्विन याने रिंकूचं कौतुक केलं असून एक मोठी गोष्ट सांगितली. जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. रिंकू केकेआरध्ये असताना सूरूवातीला त्याल नेटमधील सरावावेळी ना बॉलिंग ना बॅटींग दिली जायची. त्याला सराव करण्याचीही नेटमध्ये संधी मिळत नव्हती. नेट्समधील बॉल उचलून तो गोलंदाजांकडे देत असल्याचं अश्विनने सांगितलं.
मी रिंकूला उजव्या हाताचा धोनी समजतो. धोनी आणि त्याची तुलना होऊ शकत नाही कारण धोनी मोठा खेळाडू आहे. मात्र रिंकू हा धोनीसारखा संयमी आहे. यूपसाठी त्याने एकसारख्या धावा केल्या. त्यानंतर आपलं संघामधील स्थान पक्क केलं असल्याचं आर. अश्निन म्हणाला.
दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या चार विकेट गेल्या होत्या. त्यावेळी मैदानात रोहित शर्माने एकट्याने एक बाजू लावून धरली होती. गडी दबावात आला तेव्हा त्याच्याकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. रिंकूनेही कोणाला नाराज केलं नाही. कॅप्टनसोबत मैदानात टिकून राहून दुसऱ्या बाजूने लढत होता. रिंकूने या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.