मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत सध्या क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. मागच्या वर्षी ऋषभ पंतचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात त्याला जबर मार लागला होता. अपघातानंतर ऋषभ पंत वेगाने रिकव्हर होत असून सध्या तो नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) मध्ये वॉकरच्या मदतीने चालत आहे. अपघातानंतर ऋषभ पंतचं आयुष्य बदलून गेलंय. यातच आता त्याने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
अपघातानंतर पंतच्या जीवनात अनेक बदल झाले आहे. यातच त्याने एक मोठा निर्णय घेवून सर्वांनाच धक्का दिला आहे. ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंड येथे झाला. पण त्याने अपघातानंतर आपल्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये बदल गेला आहे.
सोशल मीडियावर इन्स्टाच्या बायोमध्ये जन्मतारीख बदलून 1 जानेवारी 2023 केलीये. ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी भयंकर अपघात झाला होता. अपघातनंतर त्याच्या पुढील करिअरवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत, त्याचं करिअर संपल्याचे सांगितले जात होतं. पण ऋषभ पंत आता जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
ऋषभ पंत दिल्लीहून त्याच्या गावी जाण्यासाठी स्वतः चार चाकी गाडी चालवत निघाला होता. त्यातच त्याचा देहराडून जवळ 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. या भयंकर अपघातात पंतच्या गाडीला आग लागून, पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला देहराडून येथील हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुखापत गंभीर असल्याने त्याला एअरलिफ्ट करुन मुंबईला हलवण्यात आले. पंतवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पंत मागच्या काही दिवसांपासून नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये आहे.
दरम्यान, ऋषभ पंतने 2022 साल गाजवत टिमसाठी चांगले प्रदर्शन केले होते. त्याने टिम इंडियासाठी 7 मॅच खेळत 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या होत्या.