मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा सातवा सामना श्रीलंकेसोबत उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघ ट्रायडंट हॉटेलमध्ये राहिला असून या हॉटेलच्या खाली मरिन ड्राईव्ह आहे. सामन्याच्या एकदिवसआधी स्काय म्हणजेच सूर्यकुमार यादव याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव मरिन ड्राईव्हवर गेलाय, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याने वेश बदलला होता.
सूर्यकुमार यादव याने वेश बदलत स्वत:च्या फलंदाजीबद्दल तिथे असलेल्या लोकांना प्रश्न विचारले. वेश बदलताना सूर्याने टॅटू लपवण्यासाठी फुल शर्ट, मास्क, चष्मा आणि टोपी घातली होती. हॉटेलमधून बाहेर पडताना रविंद्र जडेजाही त्याला ओळखू शकला नाही. सूर्या कॅमेरामन बनला होता यावेळी त्याने भारतीय संघाबद्दल काही प्रश्न विचारले. तेव्हा एका चाहत्याने सूर्यकुमार याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं सांगितलं.
Presenting Suryakumar Yadav in a never seen before avatar 😲🤯
What’s our Mr. 360 doing on the streets of Marine Drive 🌊
Shoutout 👋🏻 if you were on SURYA CAM last evening 🤭#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSL
WATCH 🎥🔽 – By @28anand
— BCCI (@BCCI) November 1, 2023
सूर्यकुमार याने एका तरूणीला त्याच्या फलंदाजीबद्दल विचारल्यावर तिने, सूर्यीची बॅटींग पाहायला मजा येते. तो ३५० डिग्री खेळाडू असून पुढील सामन्यात त्याला संघाता जागा मिळेल अशी आशा करते, असं सांगितलं. शेवटी सूर्याला राहवलं नाही आणि त्याने आपल्या खास फॅनसमोर मास्क आणि कॅप काढली. सूर्याला पाहून तिला विश्वास बसत नव्हता, तिने एक सेल्फी घेतला त्यानंतर सूर्या तिथून गाडीत बसून निघून गेला.
दरम्यान, भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्या वानखेडे मैदानावर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव याचं स्थान पक्क मानलं जात आहे. कारण आयपीएलमध्ये सूर्याचं वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड आहे.