मोहाली | टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 आधी अखेरची टी 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया पहिल्यांदाच अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. हा सामना 11 जानेवारी रोजी पंजाबमधील मोहालीतील पीसीएच्या आएस बिंद्रा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या सरावाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओत, टीम इंडियाच्या खेळाडूंसह हेड कोच राहुल द्रविड मैदानात दिसत आहेत. अनेक खेळाडू स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करत आहेत. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी नेट्समध्ये बॅटिंगचा सराव केला. तर पेसर्स आणि स्पिनर्सनी गोलंदाजीचा सराव केला. मोहालीतील माहोल हा गारेगार आहे. त्यामुळे अनेक खेळाडू हे उबदार कपड्यांसह नेट्समध्ये होते.
दरम्यान अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून विराट कोहलीने माघार घेतली आहे. द्रविड यांनी याबाबतची माहिती बुधवारी 10 जानेवारी रोजी सामन्याच्या पूर्वसंध्येला दिली. विराटची लेक वामिका हीचा आज (11 जानेवारी) तिसरा वाढदिवस आहे. त्यामुळे विराटने पहिल्या सामन्यातून माघार घेतल्याचा कयाल लावला जात आहे.
टीम इंडियाचा जोरदार सराव
#TeamIndia all in readiness for the 1st T20I against Afghanistan in Mohali.#INDvAFG pic.twitter.com/ogNLHdt8ak
— BCCI (@BCCI) January 11, 2024
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.