मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेसाठी आता कोणत्याही क्षणी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलंय. आशिया कप स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार करण्यात आलं आहे. त्यानुसार एकूण 13 पैकी 4 सामने हे पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तर उर्विरत 9 मॅच श्रीलंकेत पार पडणार आहेत. एकूण 6 संघांमध्ये आशिया कपसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. एकूण 6 संघांची 2 संघामध्ये विभागणी करण्यात आली आहे.आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून कुणाला संधी मिळते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या दरम्यान आशिया कपसाठी टीम इंडियाकडून कुणाकुणाला संधी मिळू शकते, याबाबत मोठी अपडेट आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय एकूण 16 ते 18 खेळाडूंचा संघ जाहीर करु शकते. आशिया कप आणि त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पीटीआयनुसार, या दोन्ही स्पर्धांसाठी टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट या दोघांना संधी मिळू शकते. तर जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल या दोघांचं कमबॅक होईल.
बीसीसीआय आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्याच्या शेवटपर्यंत कधीही करु शकते. या आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघे ओपनिंग करु शकता. तर मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे त्रिकूट असू शकतं.
संभावित संघात अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या तिघांवर बॉलिंग आणि बॅटिंग अशा दुहेरी जबाबदाऱ्या असणार आहेत. तसेच हार्दिक चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत असू शकतो. तर फिरकी बॉलर म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या कुलचा जोडीचा समावेश केला जाऊ शकतो.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट , मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.