मुंबई | टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन याच्यासाठी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका अविस्मरणीय ठरली. आर अश्विन याने इंग्लंड विरुद्ध या कसोटी मालिकेत 500 विकेट्सचा टप्पा गाठला. तसेच अश्विन धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळला. अश्विनने या 100 व्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. अश्विन यासह टीम इंडियाकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. अश्विनने अनिल कुंबळेचा 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडून काढला. अश्विनला आता कामगिरीचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. आर अश्विन टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये नंबर 1 ठरला आहे.
आयसीसी दर बुधवारी क्रमवारी जाहीर करते. आर अश्विन याने या क्रमवारीत सहकारी जसप्रीत बुमराह याला पछाडत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. अश्विन व्यतिरिक्त कुलदीप यादव यालाही जबरदस्त फायदा झाला आहे. कुलदीपने इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनच्या नावावर आता 870 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर जसप्रीत बुमराहला संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलंय. बुमराहसोबत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आहे. या दोघांच्या नावावर प्रत्येकी 847 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. रवींद्र जडेजा याने बॉलिंग रँकिंगमधील आपलं सातवं कायम राखण्यात यश मिळवलंय. तर कुलदीप यादवने 15 स्थानांची झेप घेत 16 व्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. आयसीसीच्या बॉलिंग रँकिंग 20 मध्ये अशाप्रकारे टॉप 4 गोलंदाजंचा समवेश झाला आहे.
टीम इंडियाचा आर अश्विन आयसीसी नंबर 1 बॉलर
🇮🇳 🔁 🇮🇳
A new No.1 bowler has been crowned in the ICC Men’s Test Player Rankings after the #INDvENG series 🎖
— ICC (@ICC) March 13, 2024
आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा केन विलियमसन पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर जो रुट दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि स्टीव्ह स्मिथ चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला 5 स्थांनाचा फायदा झालाय. रोहित 10 व्या वरुन पाचव्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. धर्मशालेत इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत शतक ठोकल्याचा फायदा रोहितला रँकिंगमध्ये झाला.