अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 47 सामन्यानंतर अखेर 2 फायनलिस्ट टीम निश्चित झाल्या आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 फायनल सामना रंगणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 3 विकेट्स मात करत आठव्या फायनलमध्ये पोहचली. वर्ल्ड कप 2023 अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे.
टीम इंडियाचं अहमदाबादमधील क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या स्वागताचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आता टीम इंडियाकडे फायनलच्या सरावासाठी मोजून 2 दिवसांचा वेळ आहे. या 48 तासांमध्ये टीम इंडिया जोरदार सराव करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या सेमी फायनलनंतर कोलकाता इथून अहमदाबादला रवाना होणार आहे.
दरम्यान टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या 2 अंतिम संघांची वर्ल्ड कप साखळी फेरीतील कामगिरीबाबत आपण जाणून घेऊयात. टीम इंडियाने साखळी फेरीत 9 पैकी 9 सामने जिंकले. टीम इंडियाला कोणत्याही संघाला पराभूत करता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने 9 पैकी 7 सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघाकडून पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यानंतर साखळी फेरीतील सातच्या सात सामने जिंकून सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं.
टीम इंडियाचं जोरात स्वागत
Team India have reached Ahmedabad.😘
Time to win the World Cup.🇮🇳#INDvsNZ #ViratKohli𓃵 #ViratKohli #ViratKholi #CWC23
#MohammadShami #SAvsAUS#Finals #WorldcupFinalpic.twitter.com/Dl75dI6acI— 🆃🄷🅾🅁 (@THOR_X_SAHIL) November 16, 2023
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.