मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत अपघातातून सावरतोय. ऋषभ पंत याने सोशल मीडियावर 2 फोटो शेअर केला आहे. पंत या फोटोंमध्ये कुबड्याच्या आधारे चालतोय. पंतच्या एका पायावर पट्टी बांधलेली आहे. पंतचा डिसेंबर 2023 मध्ये कार अपघात झाला होता. या अपघातात पंतला जबर मार लागला होता. पंत दिल्लीहून रुडकीला आपल्या राहत्या घरी जात होता.
“एक पाउल पुढे, एक पाउल आणखी मजबूत, एक पाउल उत्तम”, पंतने असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. पंत कुबड्यांद्वारे चालण्याचा प्रयत्न करतोय. पंतच्या पाय सुजलेला आहे. पंत एका पायाच्या आधारावर उभा आहे. त्यामुळे पंतला किती त्रास होत असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो.
ऋषभ पंत याचे अपघानंतरचे फोटो
One step forward
One step stronger
One step better pic.twitter.com/uMiIfd7ap5— Rishabh Pant (@RishabhPant17) February 10, 2023
काही दिवसांआधी पंतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. पंतने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. “कधी माहिती नव्हतं की बाहेर बसून शुद्ध हवेत मोकळा श्वास घेण्याने चांगलं वाटतं”, असं पंतने कॅप्शन दिलं होतं.
पंत दिल्लीवरुन रुडकीला आपल्या राहत्या घरी आईला सरप्राईज द्यायला जात होता. या दरम्यान दिल्ली-देहरादून हायवेवर गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. मात्र त्याआधीच पंत गाडीबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं.
त्यानंतर पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतवर दिनशॉ पारदीवाला यांच्या निगरानीखाली उपचार करण्यात आले.
दरम्यान नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर 7 विकेट्स गमावून 321 धावा केल्या. टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा 66 आणिअक्षर पटेल 52 धावांवर नाबाद आहेत.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.