मुंबई : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या कारला काही दिवसांपूर्वी अपघात झाला. पंतला प्रथमोपचारांनंतर आवश्यक उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आले. आता पंतच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पंतची तब्येत कशी आहे, याकडे चाहत्यांचं आणि एकूणच क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून होतं. आता पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. पंतच्या गाडीचा डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. या अपघातानंतर पंतवर लिगामेंट सर्जरी करण्यात आली.
ऋषभ पंत शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा खाटेवरुन उठून पायावर काही मिनिटांसाठी खाटेवरुन उठून उभा राहिला. पंतवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनुसार, त्याला मैदानात परतण्यासाठी किमान 4-6 महिने लागू शकतात. मात्र हे सर्व फिजीओ आणि संबंधित व्यक्तीवरही अवलंबून असतं.
पंत 30 डिसेंबर रस्ते अपघातात जखमी झाला. त्यानंतर पंतवर देहरादूनमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बीसीसीआयने पंतवर मुंबईत उपचार करण्याचं ठरवलं. त्यानुसार पंतला मुंबईत 4 जानेवारीला एअरलिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर डॉ दिनशॉ पारदीवाला यांच्या निगराणीखाली कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं.
काही दिवसांनी पंतच्या गुडघ्यावर लिगामेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. सूत्रांच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेच्या 4-5 दिवसांनंतर मंगळवारी पंतला इतरांच्या मदतीने खाटेवरुन उठवण्यात आलं. तसेच काही सेकंदांसाठी तो उभा राहिला. पंत येत्या काही दिवसांमध्ये वाकरच्या मदतीने चालण्याचा सल्ला देण्यात येईल. तसेच आणखी एक आठवडा पंत रुग्णालयात राहिल. तसेच त्याला कठीण रिहॅबची गरज पडेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
“लिगामेंट शस्त्रक्रियेनंतर त्यातून पूर्णपणे बरं होण्यासाठी 4-6 आठवडे लागतात. यानंतरच्या 2 ते 3 महिन्यांनंतर पंत पायाने सराव करु शकतो. मात्र पंतला पूर्णपणे फीट होण्यासाठी आणखी 4 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पंतला एकूण किमान 6 महिने लागू शकतात. मात्र पंतवर कशाप्रकारे लक्ष ठेवलं जातंय आणि त्याला कशाप्रकारे इतर सुविधा मिळतायेत हे देखील तितकंच महत्वाचं आहे. या पेक्षा मला लवकर बरं व्हायचंय ही व्यक्तीची इच्छाशक्तीही त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी निर्णायक ठरते.”, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा रविवारी 15 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत भिडणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची शुक्रवारी 13 जानेवारीला रात्री घोषणा करण्यात आली.