टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात जोरदार बॅटिंग केली. ऋषभ पंत आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या सत्रात एकूण 124 धावा जोडल्या. या जोडीमध्ये चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 190 बॉलमध्ये नॉट आऊट 138 रन्सची पार्टनरशीप झाली आहे. टीम इंडियाची धावसंख्या 3 बाद 205 अशी आहे. पहिल्या सत्रादरम्यान शुबमन आणि ऋषभ या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत अर्धशतकं ठोकली. तसेच शतकाकडे कूच केलं आहे. पंतचं कमबॅकनंतर हे पहिलंच अर्धशतक ठरलं. पंतने या खेळीदरम्यान एकहाती षटकार ठोकला. पंतने या दरम्यान बांगलादेशची फिल्डिंग लावली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पंतने बांगलादेशच्या लावलेल्या फील्डिंगचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतने बॅटिंगदरम्यान बांगलादेशची फिल्डिंग लावली. विशेष म्हणजे पंतने दिलेला सल्ला बांगलादेशने मान्य केला. बांगलादेशच्या कॅप्टनने पंतने सांगितलेल्या जागी फिल्डर लावला. या व्हायरल व्हीडिओत पंत “एक फिल्डर इधर आयेगा”, असं म्हणतोय. हा सर्व प्रकार पाहून क्रिकेट चाहत्यांनाही हसू आवरलं नाही.
दरम्यान टीम इंडियाने लंचब्रेकपर्यंत 432 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या सत्रापर्यंत भारताने 3 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. तसेच भारताकडे पहिल्या डावातील 227 धावांची आघाडी होती. अशाप्रकारे भारताने 400 पार मजल मारली. आता कॅप्टन रोहित शर्मा टीम इंडियाचा डाव किती धावांवर घोषित करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
ऋषभने लावली बांगलादेशची फिल्डिंग
Rishabh Pant setting the field for Bangladesh. 😆🔥
– What a character, Pant. pic.twitter.com/sRL69LPgco
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.