अखेर ‘त्या’ खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार?, राहुल ना शुबमन ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग!

| Updated on: Mar 06, 2023 | 6:58 PM

टीम इंडिया सलामीला आणखी एक प्रयोग करण्याची शक्यता आहे. ना राहुल ना शुबमन गिल मग कोणता खेळाडू आहे जो रोहित शर्मासोबत ओपनिंगला येऊ शकतो.

अखेर त्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार?, राहुल ना शुबमन हा खेळाडू करणार ओपनिंग!
Follow us on

Ind vs Aus 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा सामना काही दिवसांवर आला आहे. मात्र त्याआधी संघात बदल पाहायला मिळू शकतो. पहिल्या तिन्ही कसोटीमध्ये भारताची सलामीची जोडी फेल गेलेली दिसली. के एल राहुल आणि शुबमन गिल यांना बदलून संघ व्यवस्थापनाने बदल करून पाहिला होता. मात्र कोणत्याही जोडीने अपेक्षित अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे आता टीम इंडिया सलामीला आणखी एक प्रयोग करण्याची शक्यता आहे. ना राहुल ना शुबमन गिल मग कोणता खेळाडू आहे जो रोहित शर्मासोबत ओपनिंगला येऊ शकतो.

नेमका कोण आहे ‘हा’ खेळाडू?

भारताकडून खेळताना या खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं आहे. हा खतरनाक खेळाडू दुसरा कोणी नसून यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन आहे. 23 वर्षीय स्फोटक फलंदाज इशान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत रोहित शर्मासोबत सलामीला उतरू शकतो.

शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 ते 13 मार्च दरम्यान खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला अहमदाबादमध्ये होणारा चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल.

बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी टीम इंडियाचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर संघाला खालच्या मधल्या फळीत एका स्फोटक फलंदाजाची गरज होती. यामुळे ईशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पहिल्या 3 सामन्यात ईशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही.

अहमदाबाद कसोटीत भारताची संभाव्य अंतिम 11

रोहित शर्मा (कर्णधार),  ईशान किशन (विकेटकीपर), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशान किशन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, उमेश यादव.