IND vs SA | सचिन धसची 96 धावांची झुंजार खेळी, दक्षिण आफ्रिके विरुद्ध नर्व्हस नाईंटीचा शिकार

| Updated on: Feb 06, 2024 | 9:12 PM

Sachin Dhas | सचिन धस याने नेपाळ विरुद्ध सुपर 6 मधील अखेरच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. त्यानंतर सचिनकडे दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसरं शतक करण्याची संधी होती. मात्र सचिनचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं.

IND vs SA | सचिन धसची 96 धावांची झुंजार खेळी, दक्षिण आफ्रिके विरुद्ध नर्व्हस नाईंटीचा शिकार
Follow us on

बेनोनी | मराठवाड्यातील बीडच्या सचिन धस या नव्या दमाच्या मराठमोळ्या फलंदाजाने सातासमुद्रापार डंका वाजवलाय. सचिन धसने टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिके विरुद्ध अंडर 19 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 96 धावांची निर्णायक खेळी केलीय. सचिनला सलग दुसरं शतक करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र सचिनने वैयक्तिक विक्रमाची पर्वा न करता टॉप गिअरमध्ये खेळला. या फटकेबाजीच्या प्रयत्नात सचिन दुर्देवाने नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. मात्र त्याने टीम इंडियाला विजयाजवळ आणून ठेवलं. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ही खेळी केली.

टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. पहिल्याच बॉलवर पहिला झटका लागला. त्यानंतर मुशीर खान, अर्शीन कुलकर्णी आणि प्रियांशू मुलिया झटपट आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 35 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला.

हे सुद्धा वाचा

दोघांनी सिंगल-डबल रन काढल्या. संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले. या दरम्यान सचिन धस आणि उदय सहारन या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. दोघांनी अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला भक्कम स्थितीत आणून ठेवलं आणि दक्षिण आफ्रिकेवर दबाव निर्माण केला. सचिन शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. सारा भारत सचिनच्या सलग दुसऱ्या शतकासाठी उत्सूक होता. मात्र सचिन 96 धावांवर आऊट झाला.

दरम्यान सचिन धस आणि उदय सहारन या जोडीने पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 197 बॉलमध्ये 171 धावांची भागीदारी केली. या जोरावरच टीम इंडियाला सामन्यातील आव्हान कायम ठेवता आलं.

सचिन धसची झुंजार खेळी

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.