टीम इंडियासाठी न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संकटमोचकाची भूमिका बजावणाऱ्या सर्फराज खानला सर्वात आनंदाची बातमी मिळाली आहे. सर्फराज खान याचं प्रमोशन झालं आहे. सर्फराज खान याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सर्फराज खान बाबा झाला आहे. सर्फराज खान याची पत्नी रोमाना जहूर हीने मुलाला जन्म दिला आहे. स्वत: सर्फराजने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. सर्फराजने सोशल मीडियावर स्वत:सह वडील नौशाद खान आणि त्याच्या लेकाचा फोटो पोस्ट केला आहे. घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सर्फराज वयाच्या 27 वर्षी बाबा झाला आहे. सर्फराजला त्याच्या 27 व्या वाढदिवसाच्या आधी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. सर्फराजने लेकाला हातात घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच फोटोत सर्फराजसोबत त्याचे वडीलही आहेत. सर्फराज आणि त्याची पत्नी रोमाना जहूर यांचा 6 ऑगस्ट 2023 रोजी निकाह झाला होता. त्यानंतर आता दोघेही आई-बाबा झाले आहेत. सर्फराजची पत्नी ही मुळची जम्मू-काश्मिरची आहे. सर्फराज आणि रोमाना या दोघांची लव्ह स्टोरी खास आहे. रोमाना ही सर्फराज्या कसोटी पदार्पणावेळेस चर्चेत आली होती.
सर्फराजने या वर्षी इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे 15 फेब्रुवारीला कसोटी पदार्पण केलं होतं. सर्फराजच्या पदार्पणावेळेस रोमाना आणि नौशाद खान उपस्थित होते. सर्फराजने पदार्पणातील दोन्ही डावात 62 आणि 68 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
ज्युनिअर सर्फराज खान
Our prince has arrived! ♥️ 👑 pic.twitter.com/YHc0oq28Jm
— sarfaraz khan (@sarfarazkhan977) October 22, 2024
दरम्यान सर्फराजला न्यूझीलंड विरूद्धच्या बंगळुरु कसोटीत दुखापतग्रस्त शुबमन गिल याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. सर्फराजने या संधीचं सोनं केलं. टीम इंडिया अडचणीत असताना सर्फराजने ऋषभ पंतसह निर्णायक भागीदारी केली. तसेच दीडशतकी खेळी करत टीम इंडियाची लाज वाचवली होती. सर्फराजने या खेळीसह दुसऱ्या सामन्यातही आपला दावा आणखी मजबूत केला आहे. त्यामुळे सर्फराजला दुसऱ्या सामन्यासाठी संधी मिळणार की नाही? याबाबत आता चर्चा रंगली आहेत.