WI vs IND 5TH T20I | वेस्ट इंडिजसमोर मालिका विजयासाठी 166 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया रोखणार?

| Updated on: Aug 13, 2023 | 10:30 PM

West Indies vs India 5th T20I | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत आहे.

WI vs IND 5TH T20I | वेस्ट इंडिजसमोर मालिका विजयासाठी 166 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया रोखणार?
तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येत सूर्याने 111 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. भारताचा तो एकमेव खेळाडू आहे ज्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येत मोठी सर्वाधिक धावांची खेळी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
Follow us on

फ्लोरिडा | टीम इंडियाने वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला पाचव्या टी 20 सामन्यात विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. सूर्याने या 45 बॉलच्या खेळीत 3 सिक्स आणि 4 फोर ठोकले. तर तिलक वर्मा याने 27 धावांचं योगदान दिलं. सूर्या आणि तिलक या दोघांव्यतिरिक्त एकालाही 14 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.

टीम इंडियाच्या सलामी जोडीने या निर्णायक सामन्यात घोर निराशा केली. शुबमन गिल 9 आणि यशस्वी जयस्वाल 5 धावांवर आऊट झाला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने 14 धावा केल्या. तर संजू सॅमसन आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 13 धावांचं योगदान दिलं. अर्शदीप सिंह याने 8 धावा जोडल्या. कुलदीप यादव याला भोपळाही फोडता आला नाही. तर मुकेश कुमार याने 4 आणि युजवेंद्र चहल शून्यावर नाबाद परतला.

हे सुद्धा वाचा

कोण जिंकणार मालिका?

वेस्ट इंडिजकडून रोमरिया शेफर्ड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर अकील होसेन आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रोस्टन चेज याच्या खात्यात एक विकेट गेली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकील होसेन आणि अल्झारी जोसेफ.