Team India WC 2023 | टीम इंडियाला मोठा झटका, वर्ल्ड कपमधून मोठा खेळाडू ‘आऊट’!

| Updated on: Jun 29, 2023 | 7:31 PM

Indian Cricket Team | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेआधी टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Team India WC 2023 | टीम इंडियाला मोठा झटका, वर्ल्ड कपमधून मोठा खेळाडू आऊट!
Follow us on

मुंबई | क्रिकेट टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट,वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यानंतर लागलीच टीम इंडिया आयर्लंड दौरा करणारा आहे. तर यानंतर आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीने या वर्ल्ड कप स्पर्धेचं 100 दिवसांआधीच वेळापत्रक जाहीर केलं. या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा 8 ऑक्टोबरपासून श्रीगणेशा होणार आहे.टीम इंडियाला वर्ल्ड कपआधी मोठा झटका लागला आहे.

टीम इंडियाचा बॅट्समन केएल राहुल हा एनसीएमध्ये मेहनत घेतोय. केएल लवकरच कमबॅक करणार आहे. यॉर्कर किंग जस्प्रीत बुमराह याच्या कमबॅककडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. केएल आणि बुमराह आशिया कप स्पर्धेत कमबॅक करण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईकर श्रेयस अय्यर हा देखील कमबॅकसाठी जोरदार तयारी करतोय. मात्र श्रेयस अय्यर याची दुखापत टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

श्रेयस अय्यर वर्ल्ड कपमधून आऊट!

श्रेयस अय्यर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिट होणार की नाही, याबबतची चिंता बीसीसीआयच्या मेडिकल टीमला सतावतेय. यामुळेच सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या दोघांना वनडे फॉर्मेटमध्ये संधी देण्यात येत आहे. हे दोघेही श्रेयसची जागा घेऊ शकतात. त्यामुळे बीसीसीआयने श्रेयसच्या बाबतीत प्लान बी तयार ठेवला आहे.

हे सुद्धा वाचा

अय्यरला नक्की कसला त्रास?

अय्यरला गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास सतावतोय. श्रेयसला या त्रासामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एका सामन्याला मुकावं लागलं होतं. या दुखापतीमुळेच श्रेयसचा आयपीएल 16 वा मोसम आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून डब्बा गूल झाला होता. आता काही दिवसांपूर्वी श्रेयसच्या पाठीची शस्त्रक्रिया पार पडली. आता श्रेयस बंगळुरुतील एनसीएत दुखापतीतून कमबॅक करण्यासाठी तयारी करतोय.

श्रेयस अय्यर याची क्रिकेट कारकीर्द

श्रेयस अय्यर याने टीम इंडियाकडून टेस्ट, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये आपलं योगदान दिलं आहे. श्रेयसने 10 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतकासह 666 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयसने 42 वनडेत 2 खणखणीत शतकांसह 1 हजार 631 रन्स केल्या आहेत. तर 49 टी 20 मॅचमध्ये श्रेयसच्या नावावर 2 हजार 776 धावा आहेत. तसेच श्रेयसला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभवही आहे.