World Cup 2023 Final आधी शुबमन गिल याच्या दुखापतीबाबत मोठी बातमी

| Updated on: Nov 16, 2023 | 8:33 PM

Shubman Gill Injury Update | शुबमन गिल याला डेंग्युमुळे वर्ल्ड कप 2023 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यानंतर आता गिलला सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पायाला क्रॅम्प आला. त्यामुळे गिलला मैदानाबाहेर जावं लागलं होतं.

World Cup 2023 Final आधी शुबमन गिल याच्या दुखापतीबाबत मोठी बातमी
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या उंपात्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडच्या 2019 मधील सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा घेतला. तसेच टीम इंडिया 2011 नंतर 12 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याला दुखापतीमुळे त्रास झाला. गिलला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. शुबमन परत बॅटिंगसाठी मैदानात परतला. शुबमनने मोठे फटकेही मारले. मात्र फायनलच्या पार्श्वभूमीवर शुबमन गिल खेळू शकणार की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गिलच्या दुखापतीबाबत अपडेट

न्यूझीलंड विरुद्ध जिंकल्यानंतर शुबमनने संवाद साधला. बॅटिंग करताना त्रास झाल्याचं शुबमनने सांगितलं. तसेच शुबमनने या दुखापतीमुळे शतक ठोकण्याची संधी हुकली, याबाबतही प्रतिक्रिया दिली. क्रॅम्प आल्याने मला त्रास झाला. त्यामुळे आणखी वेदना होऊ लागल्या. मी फायनल मॅचसाठी तयार होईन”, असा विश्वास शुबमनने पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

“मला जर क्रॅम्पचा त्रास झाला नसता तर, मी शतक केलं असतं. मात्र त्यानंतरही आम्ही अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहचलो होतो. आम्ही 400 धावांपर्यंत पोहचण्याची आशा करत होतो. मी शतक करण्यात अपयशी ठरलो, याबाबत मला काहीच फरक पडत नाही.”, असंही गिलने नमूद केलं. मात्र शुबमन फायनलमध्ये खेळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टीम इंडिया-न्यूझीलंड सामन्याबाबत थोडक्यात

दरम्यान टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर मोहम्मद शमी याने न्यूझीलंडला झटपट 2 झटके दिले. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि कॅप्टन केल विलियमनस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 179 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाचे धाबे दणाणले होते. मात्र त्यानंतर पुन्हा मोहम्मद शमी यानेच एकाच ओव्हरमध्ये न्यूझीलंडला झटके देत बॅकफुटवर ढकललं. टीम इंडियाने इथूनच कमबॅक करत सामनाही जिंकला आणि फायनलमध्ये धडक मारली. मोहम्मद शमी टीम इंडियाच्या विजयाचा कलाकार ठरला. शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.