कोलंबो | टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल याने बांगलादेश विरुद्ध आशिया कप 2023 सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात झुंजार शतकी खेळी केली आहे. टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर डेब्युटंट तिलक वर्मा 5 धावांवर बाद झाला. केएल राहुल 19 रन्सची झुंजार खेळी करुन माघारी परतला. ईशान किशन 5 धावांवर बाद झाला.त्यामुळे टीम इंडियाची वाईट स्थिती झाली. टीम इंडियाचा टॉप आणि मिडल ऑर्डरने सपशेल निराशा केली. त्यामुळे टीम अडचणीत सापडली. मात्र शुबमन गिल याने एक बाजू धरुन ठेवत झुंजार शतक ठोकलंय.
शुबमन गिल याने 117 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 खणखणीत सिक्सच्या मदतीने हे शतक ठोकलं. शुबमनने 85.47 च्या स्ट्राईक रेटने या 100 धावा पूर्ण केल्या. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. शुबमन
शतकानंतर आणखी आक्रमक झाला. शुबमनने शतक ठोकल्यानंतर जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. शुबमनने मिळेल तिथे फटके मारले. मात्र शुबमनला हेच धाडस महागात पडलं. शुबमन मोठी खेळी करु शकला असता. मात्र तो फटकेबाजीच्या नादात आऊट झाला.
शुबमन गिल याचा तडाखा
A crucial hundred from Shubman Gill but the job isn’t done yet 👀
Can he take India to a win? 🧐#INDvBAN | https://t.co/xutmPOXIop pic.twitter.com/v90ARwFWe9
— ICC (@ICC) September 15, 2023
महेदी हसन याने शुबमनला तॉहीद हृदाय याच्या कॅच आऊट केलं. शुबमनने 133 बॉलमध्ये 8 चौकार आणि 5 कडक सिक्सच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. शुबमनच्या या झुंजार खेळीमुळे टीम इंडियाने 200 पार मजल मारली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.