AUS vs IND : टीम इंडियाला मोठा झटका, या खेळाडूला गंभीर दुखापत, पहिल्या सामन्याला मुकणार?

| Updated on: Nov 16, 2024 | 4:31 PM

India vs Australia 1st Test : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होत आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहितसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

AUS vs IND : टीम इंडियाला मोठा झटका, या खेळाडूला गंभीर दुखापत, पहिल्या सामन्याला मुकणार?
Follow us on

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा पर्थ येथे होणार आहे. भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी पात्र ठरेल. त्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. एका बाजूला कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत प्रशचिन्ह असताना अशात टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे या खेळाडूवर पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.

शुबमन गिल याला दुखापत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याला दुखापत झाली आहे. शुबमनला पर्थमध्ये इंडिया ए विरुद्धच्या सामन्यात बोटाला दुखापत झाली. शुबमनला फिल्डिंगदरम्यान स्लीपमध्ये कॅच घेताना दुखापत झाली. शुबमनला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शुबमनवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. अशात गिल पर्थ कसोटीत खेळणार की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण

दरम्यान टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खान याला सरावादरम्यान 14 नोव्हेंबरला वाका येथे दुखापत झाली मात्र ही दुखापत काळजी करण्यासारखी नव्हती. तर केएल राहुलला 15 तारखेला दुखापत झाली. त्यामुळे केएलला बॅटिंग करता आली नाही. तसेच विराटही दुखापतीमुळे चिंतेत होता. मात्र उपचारांनंतर सर्व काही निट असल्याचं स्पष्ट झालं.

शुबमनला दुखापत

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.